कृषी कायद्याविरोधात दलित महासंघाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:30+5:302021-02-06T04:42:30+5:30

बांबवडे : केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाच्या निषेधार्थ व नवीन घटनाबाह्य कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी भारतीय दलित ...

Dalit Federation's fast against agricultural law | कृषी कायद्याविरोधात दलित महासंघाचे उपोषण

कृषी कायद्याविरोधात दलित महासंघाचे उपोषण

बांबवडे : केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाच्या निषेधार्थ व नवीन घटनाबाह्य कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने बांबवडे पोलीस स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.

यावेळी श्रीकांत कांबळे म्हणाले की, जाचक कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी देशातील शेतकरी दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. दिवसेंदिवस त्यांना पाठिंबा वाढत चालला आहे. भारतीय दलित महासंघाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेले उपोषण केंद्र सरकार दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर सत्ता भोगता तेच शेतकरी तुम्हाला देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव केंद्र सरकारने ठेवावी, असा इशारा कांबळे यांनी दिला. उपोषणास आकाश कांबळे, पंकज घोलप, सूरज कांबळे, प्रदीप माने, अमोल कांबळे, किरण कांबळे, गणेश कांबळे, विक्रम समुद्रे, मनोज गायकवाड, सागर घोलप, महेश जाधव, दयानंद शिवजातक, चंद्रकांत काळे, मनोहर खोत इ. सहभागी झाले आहेत.

०४ दलित महासंघ बांबवडे

फोटो ,

बांबवडे पोलीस स्थानकासमोर भारतीय दलित महासंघाच्या वतीने सुरू असलेले लाक्षणिक उपोषण.

Web Title: Dalit Federation's fast against agricultural law