Crime News : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला लोखंडी साखळीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:18 PM2019-11-30T13:18:00+5:302019-11-30T13:20:55+5:30

सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मैदानावर खेळ सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याची काहीतरी चूक झाली. यावेळी त्याला बाजूला घेऊन शिक्षकाने अपमानास्पद वक्तव्य केले.

Crime News | Crime News : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला लोखंडी साखळीने मारहाण

Crime News : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला लोखंडी साखळीने मारहाण

Next
ठळक मुद्देपालकांची पोलिसांकडे तक्रार : शहरातील संतापजनक प्रकार

कोल्हापूर : शहरातील एका नामवंत विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने शुक्रवारी दुपारी लोखंडी साखळीने बेदम मारहाण केली. त्यात विद्यार्थ्याच्या डोक्यावर व हातावर व्रण उठले आहेत. संतप्त पालकांनी याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित शिक्षकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल नॉट रिचेबल लागला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

अधिक माहिती अशी, सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मैदानावर खेळ सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याची काहीतरी चूक झाली. यावेळी त्याला बाजूला घेऊन शिक्षकाने अपमानास्पद वक्तव्य केले. त्यामुळे सर्व विद्यार्थी त्याच्याकडे पाहून हसू लागले. हसणा-या मुलांना शांत करून संतप्त शिक्षकाने लोखंडी साखळीने त्या विद्यार्थ्याच्या हातावर, पाठीवर व डोक्यावर मारहाण केली.

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्याने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. शिक्षकांना जाब विचारण्यासाठी ते शाळेत आले असता कोणीच नव्हते. संबंधित शिक्षकाचा फोनही बंद होता. त्यामुळे सायंकाळी पालक जखमी विद्यार्थ्याला घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन ते घरी गेले. रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद झाली नव्हती.
 

 

Web Title: Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.