शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून न्यूझीलंडची धुळधाण, कोल्हापुरातील शिवाजी चौकात जल्लोषाचा 'रंगोत्सव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:51 IST

'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष

कोल्हापूर : न्यूझीलंडची धुळधाण करीत टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतच विश्ववीर ठरल्यानंतर कोल्हापुरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमींनी रविवारी जल्लाेष करत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. या विजयानंतर तरुणाईने तिरंगा फडकवत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष केला.

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिथे क्रिकेट विजयानंतर नेहमीच गर्दी जमते. विजय नजरेच्या टप्प्यात येताच साडेदहा वाजल्यापासूनच क्रिकेटचे चाहते शिवाजी चौकात पोहोचले आणि तिरंगा फडकवत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी हॉटेल्स, तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ध्वनी यंत्रणा (साउंड सिस्टीम) लावून नृत्य करत जल्लोष केला.

फटाक्यांची आतषबाजी करत मध्यरात्रीपर्यंत हा जल्लोष सुरू होता. दरम्यान, तिरंगा फडकवत, आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत हा विजय साजरा करणाऱ्यांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. काहीजण विश्वचषकाची प्रतिकृती मिरवत या आनंदात सहभागी झाले. या विजयामुळे कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उंच ठिकाणी जाऊन जल्लोषाची छायाचित्रे व व्हिडीओ घेण्यात आले. मोबाइल कॅमेऱ्यावर अनेकांनी छोटे छोटे व्हिडीओ, रिल्स सोशल मीडियावर अपलोड केले. अनेकजण सेल्फी काढत होते.

क्रिकेटप्रेमींचे विशेष नियोजन...

साप्ताहिक सुटीचा रविवार, रंगपंचमीचा उत्साह आणि भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार यामुळे क्रिकेटप्रेमींनी जल्लोषाचे विशेष नियोजन केले होते. अनेकांनी एकत्रित बसून सामन्याचा आनंद लुटला. तालीम संस्था, तरुण मंडळांची कार्यालये, पेठांमधील मुख्य चौक, उद्याने, हॉटेल्स-रेस्टॉरंट व लॉन्समध्ये मोठ्या स्क्रीन लावून सामना पाहण्याचे नियोजन केले होते. रंगपंचमी असल्यामुळे अनेकांनी पुन्हा एकदा रंग उधळून आपला आनंद व्यक्त केला. भारताने सामना जिंकल्याने या नियोजनाचा आनंद द्विगुणित झाला.

इचलकरंजीत क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

इचलकरंजी : येथील मलाबादे चौकामध्ये क्रिकेटप्रेमी एकत्र येत मोठा जल्लोष केला. रंगांच्या उधळणीबरोबरच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. काही षटके शिल्लक असताना क्रिकेटरसिकांनी थेट मलाबादे चौकाकडे येण्यास सुरुवात केली. अनेकांनी वाहने घेऊन तर काहींनी चालत चौक गाठला. त्या ठिकाणी आल्यानंतर हातामध्ये फलक घेऊन वाद्याच्या गजरात मोठा जल्लोष केला.

विविध रंगांची उधळण करण्याबरोबरच हलगी आणि घुमक्याच्या तालावर नृत्याचा ठेका झाला. नागरिकांच्या गर्दीने चौकाचा परिषद फुलून गेला होता. पुरुषाबरोबर महिला आणि लहान मुलांनीही या चौकात हजेरी लावली आणि जल्लोष साजरा केला. तिरंगा ध्वज आणि आपल्या आवडत्या खेळाडूंची छायाचित्रे घेऊन युवकांनी चौकात सहभाग घेतला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : India Thrash New Zealand: Celebrations Erupt in Kolhapur's Shivaji Chowk

Web Summary : India's T20 World Cup victory over New Zealand sparked vibrant celebrations in Kolhapur. Cricket fans gathered at Shivaji Chowk, waving flags, setting off fireworks, and chanting patriotic slogans. Celebrations also took place in Ichalkaranji, with music, dancing, and color.