अवचितवाडी येथील दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:29+5:302021-07-10T04:17:29+5:30

७७ वर्ष वयाच्या मालूबाई कृष्णा आसबे यांचे रात्री १० वा.च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ग्रामस्थ व नातलगांसह कुटुंबाने त्यांना ...

A couple from Avchitwadi died on the same day | अवचितवाडी येथील दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू

अवचितवाडी येथील दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू

७७ वर्ष वयाच्या मालूबाई कृष्णा आसबे यांचे रात्री १० वा.च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ग्रामस्थ व नातलगांसह कुटुंबाने त्यांना रात्री अखेरचा निरोप दिला. मालूबाई यांच्या निधनाचा पती कृष्णा जिवबा आसबे यांना धक्का बसला. काही वेळातच त्यांची तब्येत खालावत गेली. आणि दहा तासांच्या अंतराने दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास कृष्णा आसबे (वय ८७) यांनीही अखेरचा श्वास घेतला. हे दाम्पत्य गेली पन्नास वर्षे वारकरी संप्रदायात होते. हमिदवाडाच्या सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्यात अकाउंटंट विभागामधील कर्मचारी पांडुरंग आसबे यांचे ते आई-वडील होत. पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०९ मालूबाई आसबे

०९कृष्णा आसबे

Web Title: A couple from Avchitwadi died on the same day