भटक्या, उनाड श्वानांची मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:07+5:302021-01-21T04:23:07+5:30

कोल्हापूर : शहरातील भटक्या व उनाड श्वानांची मोजणी करण्याची मोहीम महानगरपालिका आरोग्य विभागाने बुधवारपासून सुरू केली. दिवसभरात ८१५ श्वानांची ...

Counting of stray, unadulterated dogs begins | भटक्या, उनाड श्वानांची मोजणी सुरू

भटक्या, उनाड श्वानांची मोजणी सुरू

कोल्हापूर : शहरातील भटक्या व उनाड श्वानांची मोजणी करण्याची मोहीम महानगरपालिका आरोग्य विभागाने बुधवारपासून सुरू केली. दिवसभरात ८१५ श्वानांची मोजणी पूर्ण झाली. या मोहिमेला शहरातील सर्वच नागरिकांना सहकार्य करता यावे, म्हणून सोमवारी सकाळी सात ते आठ या वेळेत विशेष फोटो पाठविण्याची मोहीम राबिवली जाणार आहे.

शहरात भटक्या व उनाड श्वानांचा उपद्रव वाढला आहे. त्याची दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाने श्वानांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली आहेत. गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी ८१५ श्वानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. ही मोहीम आणखी काही दिवस चालणार आहे. हा प्रारंभिक सर्व्हे असून त्यातून शहरात नेमके किती भटके श्वान आहेत, याचा अंदाज येईल.

सोमवारी शहरातील सर्व नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होता येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईलवर श्वानांची छायाचित्रे काढून ती पत्त्यासह महापालिकेच्या मोबाईलवर पाठवायची आहेत. त्यासाठी सकाळी सात ते आठ ही वेळ देण्यात आलेली आहे.

सर्वेक्षण केलेल्या सर्व श्वानांना पकडून दि. १ फेब्रुवारीपासून महापालिकेतर्फे रेबीज लस टोचली जाऊन त्यांच्या गळ्यात पट्टे बांधले जाणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी साडेतीन हजार पट्टे उपलब्ध करून दिले आहेत.

Web Title: Counting of stray, unadulterated dogs begins