शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकांनी केला कारभाराचा पंचनामा

By admin | Updated: November 20, 2015 00:05 IST

विधिमंडळ समिती बैठक : निधी वाटप, स्वच्छतागृहावरून प्रशासन धारेवर

सांगली : महापालिकेच्या महिला नगरसेविकांनी गुरुवारी विधिमंडळ महिला व बाल हक्क समितीसमोर कारभाराचे वाभाडे काढले. नगरसेविकांना निधीचे समान वाटप केले जात नाही, सभागृहात पदाधिकारी व बाहेर अधिकाऱ्यांच्या पुरुषी वृत्तीचा त्रास होतो, अशा प्रकारच्या तक्रारींचा पाऊसच पाडला. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्र विधिमंडळ महिला व बाल हक्क समितीने सांगलीला भेट देऊन महिला नगरसेवकांची गाऱ्हाणी ऐकली. समितीच्या अध्यक्षा आमदार मनीषा चौधरी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार भारती लव्हेकर, दीपिका चव्हाण, स्मिता वाघ, हुस्नबानो खलिफा यांचे सकाळी पालिकेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर स्थायी समिती सभागृहात समिती सदस्यांनी नगरसेविकांशी चर्चा केली. समितीच्या सभापती पुष्पलता पाटील, नगरसेविका स्वरदा केळकर, प्रभाग तीनच्या सभापती संगीता खोत, निर्मला जगदाळे, आशा शिंदे, मृणाल पाटील, अनारकली कुरणे, शेवंता वाघमारे यांच्यासह ३० हून अधिक नगरसेविका उपस्थित होत्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पुष्पलता पाटील, स्वरदा केळकर म्हणाल्या की, समितीतील सदस्यांनी महिलांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. आम्ही महिलांनी पालिकेतील पुरुषप्रधान संस्कृतीविरोधात तक्रार केली. सभागृहात पदाधिकाऱ्यांची, तर बाहेर अधिकाऱ्यांची चलती आहे. त्याचा महिला नगरसेविकांना त्रास होतो. यावर सर्वपक्षीय महिला सदस्यांनी एकत्र येऊन आपआपले प्रश्न सभागृहात मांडावेत. महिलांचे प्रश्न मांडताना पक्ष बघू नका, अशी सूचना केली. बैठकीत महिलांना समान निधी मिळत नसल्याची तक्रार केली. शहरात महिलांसाठी केवळ तीनच स्वच्छतागृह आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही नव्याने एकही स्वच्छतागृह झालेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. महिलांसाठी पालिकेचे ३० टक्के गाळे राखीव आहेत; पण त्याची माहितीच नगरसेविकांना नाही. प्रशासनाने महिला बचत गटांना ७५ गाळे दिल्याचा खुलासा यावेळी केला. पण कागदावरच गाळेवाटप झाल्याचा आरोप नगरसेविकांनी केला.महापालिकेत ‘विशाखा’ कमिटी स्थापन झालेली नाही. त्यावर डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी कमिटी असल्याचे सांगितले. दोन दिवसांत कमिटी स्थापन झाली का? असा सवालही नगरसेविकांनी केला. महिला सदस्यांसाठी किती वेळ देता, अशी विचारणा समितीने आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्तांनी दररोज काहीवेळ सदस्यांसाठी राखीव असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)थेट अनुदानाची मागणीमहिला व बालकल्याण समितीचे बजेट किती कोटींचे आहे, असा सवाल समितीने केला. त्यावर सभापती पुष्पलता पाटील यांनी केवळ ७५ लाख रुपयांचे बजेट असल्याचे सांगितले. त्यातील २० टक्के रक्कम अंगणवाडी, बालवाडीच्या पगारावर खर्च होते. त्यामुळे शासनाने महिला व बालकल्याण समितीला थेट अनुदान द्यावे, अशी मागणी केली.