शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:01+5:302021-02-20T05:10:01+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेली यावर्षीची मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार रद्द केली. त्याऐवजी हुतात्मा ...

Corona warriors felicitated on behalf of Shivaji Muslim Brigade | शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने कोरोना योद्धांचा सत्कार

शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने कोरोना योद्धांचा सत्कार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेली यावर्षीची मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार रद्द केली. त्याऐवजी हुतात्मा पार्क येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार केला.

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड दरवर्षी शिवजयंती उत्सव उत्साहाने साजरा करते. त्यांनी काढलेली मिरवणूक लक्षवेधी असते. यावर्षी मिरवणूक रद्द करुन कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, माजी परिवहन समिती सभापती बाबा पार्टे यांच्या हस्ते बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, शिवसेनेचे माजी नगरसेवक नियाज खान, अय्याज अथणीकर आणि इर्शाद बागवान यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फिरोज खान उस्ताद, आझाद नाईकवडी, कादर मलबारी, अयेशा उस्ताद, रहमान नाईकवडी, राज मुजावर, निहाल खान, मोहिसीन खान, अश्किन आजरेकर, महादेव पाटील यावेळी उपस्थित होते.

फोटो : १९०२२०२१ कोल शिवजयंती मुस्लिम ब्रिगेड न्यूज

ओळी : छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी हुतात्मा पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात कोरोना योद्धांचा सत्कार केला.

Web Title: Corona warriors felicitated on behalf of Shivaji Muslim Brigade