शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात कोरोना रुग्णांची हजाराकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:46 IST

कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या चोवीस तासांत २५ रुग्ण नव्याने आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ९६६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काहीशी शिथिल झालेली प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सक्रिय होऊन कोरोना विरुद्धच्या उपाययोजना कडक करण्याचा विचार करीत आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोना रुग्णांची हजाराकडे वाटचालजिल्ह्यात शाहूवाडी तालुका आघाडीवर

कोल्हापूर : कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या चोवीस तासांत २५ रुग्ण नव्याने आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ९६६ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काहीशी शिथिल झालेली प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सक्रिय होऊन कोरोना विरुद्धच्या उपाययोजना कडक करण्याचा विचार करीत आहे.ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते पाहता दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराचा टप्पा पूर्ण करेल असे दिसते. पहिल्या दोन अडीच महिन्यांत अतिशय चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे, तसेच नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहून काहीसा सुटकेचा नि:श्वास घेतला होता. परंतु, मागच्या चार दिवसांत नवीन रुग्णांची संख्या पाहता धडकी भरावी असे चित्र समोर येत आहे.छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाने सोमवारी सकाळी दहा दिवसांत जारी केलेल्या ह्यमेडिकल बुलेटीनह्णमध्ये नव्या २५ रुग्णांची भर पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९६६ वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी ७४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून, आतापर्यंत १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णात शाहूवाडी तालुका (१८७ रुग्ण) आघाडीवर असून, सर्वांत कमी रुग्ण गगनबावडा (७) तालुक्यात आहेत. भुदरगड ७६, चंदगड १११, गडहिंग्लज ११०, हातगणंगले १८, कागल ५८, करवीर ३०, पन्हाळा २९, राधानगरी ७३, शिरोळ १२, इचलकरंजी ८६, कोल्हापूर महानगरपालिका ५९ व अन्य राज्य २० असे रुग्ण आहेत. इचलकरंजी, शिरोळ, गडहिंग्लज ही शहरे रेड झोनमध्ये आली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर