शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

CoronaVirus Lockdown : टोप येथील मृत रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:49 PM

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मृत रुग्ण वसंत गणपती पाटील ( वय ७५) यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

ठळक मुद्देटोप येथील मृत रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्हबाधित रुग्णाच्या कुटुंबातील कुटुंबातील इतर चार सदस्यांसह एकूण ३१ संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर- हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मृत रुग्ण वसंत गणपती पाटील ( वय ७५) यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.मृत पाटील हे मधुमेहाने आजारी होते. काल मध्यरात्री त्यांना उपचारासाठी सीपीआरला दाखल केले होते. त्यांना श्वसनाचा गंभीर त्रास, मधुमेह व न्युमोनिया झाल्याचे निष्पण झाले. या पूर्वीच ते अर्धांगवायूने आजारी असून उपचार घेत होते.

त्यांचा बाधित देशात, शहरात प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. तरीही रुग्णाचे वय विचारात घेवून तसेच न्युमोनिया आजार असल्याने सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. उपचार सुरु असताना सकाळी 8-30 वा त्यांचा मृत्यू झाला.

बाधित रुग्णाच्या कुटुंबातील कुटुंबातील इतर चार सदस्यांसह एकूण ३१ संशयितांचा अहवाल निगेटिव्हकोल्हापूर- पुण्याहून आलेल्या मंगळवार पेठेतील कोरोना संसर्गिताच्या कुटुंबातील एका महिला सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य ३१ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाश्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वब नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये एका महिला सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज निष्पन्न झाले. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य एकूण ३१ संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.परंतु, खबरदारीची उपाय योजना म्हणून

व्यक्तीच्या कुटुंबातील ४ निगेटिव्ह सदस्य व उर्वरीत निगेटिव्ह सदस्यांना स्वतंत्ररित्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पुढील १४ दिवस अलगीकरणात राहून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, आशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर