कोरोनाने आरोग्य जागृती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:15+5:302021-02-09T04:27:15+5:30

म्हाकवे : आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कोरोना काळातील महाभयंकर प्रसंगाला धैर्याने सामोरे गेले. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रम ...

Corona raised health awareness | कोरोनाने आरोग्य जागृती वाढली

कोरोनाने आरोग्य जागृती वाढली

म्हाकवे : आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कोरोना काळातील महाभयंकर प्रसंगाला धैर्याने सामोरे गेले. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रम आणि योगदानामुळेच तरलो गेलो. कोरोनामुळे सरकार आणि जनतेचीही आरोग्य जागृती वाढली आहे. यापुढे स्वच्छता, शिक्षण व आरोग्य यावर जोर देऊन यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

बानगे येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारत भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जि. प. सदस्य अंबरीश घाटगे प्रमुख उपस्थितीत होते. उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळी, गटविकास अधिकारी सुशील संसारे, प्रकाश कदम, मोहन पाटील, विलास पाटील, अशोक पाटील, भगवान पाटील, संजय कदम, राजू पाटील, प्रशासक विद्या लांडगे, ग्रामविस्तार अधिकारी पी. के. पाटील ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच, ग्रामस्थ उपस्थित होते. गजानन गुंडाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय कोंडेकर यांनी आभार मानले.

थेट मंजुरीच...

बानगे उपकेंद्र मंजुरीच्या मागणीची फाईल जि. प. कार्यालयातून पुढे जाण्याअगोदरच मुश्रीफ यांनी या उपकेंद्राला मंत्रालयातून मंजुरी आणली, असे सांगत ना. मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीचे अंबरीश घाटगे यांनी कौतुक केले.

बानगे येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपुजन करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी अंबरीश घाटगे, रवींद्र पाटील, मनोज फराकटे, आदी उपस्थित होते. (छाया बी. एन. पाटील, बानगे)

Web Title: Corona raised health awareness