नेजमध्ये कोरोना रुग्णसंख्या ८५ वर; तीन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:18+5:302021-05-31T04:18:18+5:30

गावची लोकसंख्या जेमतेम ४५०० आहे. तरी कोरोनाची वाढती संख्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत व ग्रामदक्षता ...

Corona in 85 patients; Three people died | नेजमध्ये कोरोना रुग्णसंख्या ८५ वर; तीन जणांचा मृत्यू

नेजमध्ये कोरोना रुग्णसंख्या ८५ वर; तीन जणांचा मृत्यू

गावची लोकसंख्या जेमतेम ४५०० आहे. तरी कोरोनाची वाढती संख्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत व ग्रामदक्षता समिती यांनी एकत्रित येऊन गावामध्ये २९ मे ते ४ जूनपर्यंत कडकडीत बंद पुकारला आहे. २२ मेपासून संख्या वाढू लागली आणि २७ मे ला एका दिवशी १३ रुग्ण आढळल्याने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामसेवक वैजयंती कोळी यांनी सांगितले.

पहिल्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी होती पण या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ८५ वर गेली आहे. खासगी व सरकारी दवाखान्यात काहींवर उपचार सुरू आहेत. तर बाहुबली येथील श्वेतांबर ट्रस्टच्या यात्री निवास विलगीकरण कक्षामध्ये ७ रुग्ण आहेत.

दक्षता समिती वेळीच दक्ष झाली आहे. तरी येणाऱ्या दिवसांत रुग्णसंख्येवर आवर घालण्यात अपयश आल्यास छोट्याशा गावात कोरोनाचा संसर्ग रोखणे आव्हान ठरू शकेल.

कोट :

सध्या गावामध्ये रुग्णसंख्या अधिक असली तरी ग्रामस्थ, पदाधिकारी, प्रशासन सर्वांच्या मदतीने कोरोनावर आम्ही नक्की मात करू- सुनील देशमुख, ग्रामदक्षता समिती सदस्य व माजी सरपंच, नेज

चौकट-

: रुग्ण संख्या – ८५, मृत्यू झालेले रुग्ण - ०३, बरे झालेले रुग्ण - ४१, -उपचार घेत असलेले रुग्ण - ३४, विलगीकरण कक्षातील रुग्ण – ०७

Web Title: Corona in 85 patients; Three people died