शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी १४३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना पुन्हा कोरोना झाला. परंतु मृत्यू त्यांना टाळता आला आहे. त्यामुळेच दुसरा डोस घेणाऱ्यांनी न चुकता हा डोस घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांनी लस घेण्यासाठी नकार दिला. सोशल मीडियावरून याबाबत अनेक चुकीचे संदेश प्रसारित होत होते. त्याचाही धसका अनेकांनी घेतला. सीपीआरसारख्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील दुसरा डोस घेतल्यानंतर कोणावर काय परिणाम होतोय ते पाहून आपण लस घेऊ या, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये शंका होती. परंतु वैद्यकीय क्षेत्रातून आणि प्रशासनाकडून वारंवार लसीचे महत्त्व विशद केले जात होते. १ जानेवारी २१ ते १३ जून २१ पर्यंतचा आढावा घेता लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही ३ हजार ४३७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १७५५ जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी १४३ जणांचा मृत्यू झाला. दुसरा डोस घेतल्यानंतर ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३२० जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

चौकट

१ जानेवारी १३ जून २१ पर्यंतची स्थिती

लसीकरण झालेले लाभार्थी- १२ लाख ७ हजार ४८

आतापर्यंतचे बाधित रुग्ण- ८२ हजार ६११

लसीकरणानंतर बाधित झालेले- ३ हजार ९९३

पहिला डोस घेतल्यानंतर बाधित- ३ हजार ४३७

पहिला डोस घेतल्यानंतरही मृत्यू- १४३

दुसरा डोस घेतल्यानंतर बाधित- ५५६

दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू- ००

कोट

कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनाची पुन्हा लागण होत नाही, असा कुठेही दावा करण्यात आलेला नाही. पुन्हा कोरोना होऊ शकतो; परंतु त्याची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होते, हे मात्र ठामपणे सांगितले जात होते. पहिल्या डोसबरोबरच दुसरा डोस महत्त्वाचा असल्याने गेल्या दोन महिन्यांत अधिकाधिक दुसरा डोस देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या डोसनंतर न झालेले मृत्यूच या डोसचे महत्त्व स्पष्ट करतात.

-डाॅ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी