शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल झालेला कंटेनर दरीत कोसळून झाले चार तुकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 23:24 IST

जखमींना चंदगड येथे प्राथमिक उपचारानंतर बेळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, चंदगड : ब्रेक फेल झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविताना कंटेनर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक व क्लिनर हे दोघेही गंभीर झाल्याची घटना शनिवारी दुपारी तिलारी घाटातील जयकर पाॅंईटवर घडली. कंटेनर शंभर फूट खोल दरीत कोसळून दगडांना धडक देत गेल्याने त्याचे चार तुकडे झाले तर प्रसंगावधान राखून चालकाने उडी मारली तर दुसरा बाहेर फेकला गेला. शशीकुमार पी (परमेश्वर आप्पा (वय ४०, रा. शिमोगा भद्रावती) व विजय मन गुप्ते (वय ३८, रा. अंकली, ता. चिकोडी) अशी जखमींची नावे असून त्यांना चंदगड येथे प्राथमिक उपचारानंतर बेळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

शशीकुमार याची प्रकृती चिंताजनक असून विजय याचा हात मनगटातून तुटला आहे. हा अपघात घाटातील जयकर पॉईंट येथे कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच वीजघर तपासणी नाक्यावरील पोलीस विजय जाधव, किरण आडे यांनी धाव घेऊन दरीत उतरून दोन्ही जखमींना बाहेर काढत तत्काळ रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता मॅगी पाकीटे, प्लास्टिक रोल घेऊन बेळगावकडून गोव्यात चाललेल्या या कंटेनरचे चाके, केबिन, इंजिन व हौदा असे चार तुकडे झाले होते. फोटो कोल्डस्कवर नावाने तिलारी घाटात कंटेनर दरीत कोसळून त्याचे चार तुकडे झाले होते.

टॅग्स :Accidentअपघात