शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांकडून गेल्या तीन महिन्यांपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत वारंवार मागणी झाली. त्यावर विद्यापीठाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. ...

विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांकडून गेल्या तीन महिन्यांपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत वारंवार मागणी झाली. त्यावर विद्यापीठाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्याबाबतच्या कार्यवाहीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांचा समावेश असणारी समिती गठीत केली. ही समिती शासन आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. ही तत्त्वे, शासन आदेश विद्यापीठ विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांसमोर ठेवून त्यांची मान्यता घेऊन महाविद्यालये आणि विद्यापीठातील अधिविभागांमधील वर्ग भरविण्यात येणार आहेत. दरम्यान, योग्य ती प्रक्रिया राबवून आणि शासन आदेशाचे पालन करून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग भरविण्यात येतील. अधिकार मंडळांच्या मान्यतेची प्रक्रिया दि. १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली जाईल, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.

चौकट

दुसऱ्या टप्प्यात वसतिगृहे सुरू करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटरसाठी शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील एक वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह क्रमांक एक, दोन आणि तीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात गेल्या अकरा महिन्यांपासून होती. ही वसतिगृहे प्रशासनाने विद्यापीठाच्या ताब्यात दिली आहेत. त्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. या वसतिगृहाचे निर्जंतुकीकरण करून महाविद्यालये सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी अखेरीस वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी सुरू केली जातील, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले.

आकडेवारी दृष्टिक्षेप

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये : २९३

एकूण विद्यार्थी : २५६२४२

मुले : १२७४२८

मुली : १२१६६७