शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस ऐक्याची एक्स्प्रेस

By admin | Updated: August 22, 2014 00:52 IST

हातकणंगले विधानसभा निवडणूक : जयवंतराव आवळेंसाठी पारंपरिक विरोधक एकत्र

आयुब मुल्ला -खोची --विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी पुन्हा घरच्या मैदानातून उतरण्याचा निर्णय घेतल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार आहे. आवळे यांचे काँग्रेसमधीलच पारंपरिक विरोधक माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार महादेवराव महाडिक यांनी एकत्रितपणे आवळेंच्या विजयासाठी झटण्याचा संकल्प केल्याने मतदारसंघात काँग्रेस ऐक्याची एक्स्प्रेस धावणार आहे.हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर आवळे यांनी २००९ च्या निवडणुकीत पुत्र राजू यांना मैदानात उतरविले होते; परंतु थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, लातूरमधून जयवंतराव आवळे यांची खासदारपदी निवड झाली होती. साहजिकच येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजू आवळेच निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. तशी घोषणाही जयवंतराव आवळे यांनी केली होती; परंतु ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह व कार्यकर्त्यांनी जयवंतराव आवळे यांनीच विधानसभा लढवावी, अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांनी स्वत:च निवडणूक लढण्याचे जाहीर केले.तत्पूर्वी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी आमदार महादेवराव महाडिक यांनी जयवंतराव आवळे यांनाच उमेदवारी देणे गरजेचे असल्याचे सांगितले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही लोकसभा निवडणुकीत आवळे यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला असल्याने या दोन नेत्यांच्या समर्थनामुळे आवळे यांचे बेरजेचे राजकारण आता चर्चेत आले आहे.गेल्या पंधरा दिवसांत आवळे यांनी ५९ गावांचा संपर्क दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर महाडिक-आवाडे यांचे समर्थक होते. त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो.