शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेतील समन्वयाचा गोंधळ थांबणार!

By admin | Updated: August 30, 2015 23:45 IST

शिवाजी विद्यापीठाचे पाऊल : परीक्षा विभागात नव्या ‘आयटी’ विभागाचा प्रारंभ

कोल्हापूर : परीक्षा विभाग, संगणक केंद्र आणि एमकेसीएल अशा तीन वेगवेगळ्या विभागांतून शिवाजी विद्यापीठाचे परीक्षाविषयक कामकाज चालत होते. त्यामुळे अनेकदा येथील प्रक्रियेतील समन्वयाचा गोंधळ निर्माण व्हायचा. मात्र, आता ते थांबणार आहे. कारण, विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विभागात स्वतंत्र असा माहिती व तंत्रज्ञान (आयटी) आणि संगणकीयदृष्टीने परीक्षेचे कामकाज करणारा विभाग सुरू केला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार विद्यापीठाने १९९५ च्या सुमारास संगणक केंद्राची निर्मिती केली. या केंद्राचा उद्देश विद्यापीठ कामकाजासाठी आवश्यक संगणकीय प्रणाली विकसित करणे आणि परीक्षाविषयक कामकाजाला साहाय्य करणे असा होता. काही वर्षांनंतर या केंद्रावर परीक्षा विषयक कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी पडली. वार्षिक पद्धतीने परीक्षा होत असताना केंद्राने उल्लेखनीय काम केले. मात्र, सत्र पद्धतीच्या परीक्षांमुळे केंद्रावरील कामकाजाचा ताण वाढला तसेच हे केंद्र, एमकेसीएल आणि परीक्षा विभाग अशा तीन स्वतंत्र विभागांकडून परीक्षाविषयक कामकाज होऊ लागले. त्यांचा फटका समन्वयाला बसला आणि कामकाजात गोंधळ सुरू झाला. वास्तविकपणे परीक्षाविषयक कामकाज एकाच छताखाली होणे आवश्यक होते. त्यानुसार परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी प्रशासनाला प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी परीक्षा विभागात नवा आयटी विभाग सुरू करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. या नव्या विभागासाठी सध्या संगणक केंद्रात परीक्षाविषयक कामकाज करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांची परीक्षा विभागात नियुक्ती केली तसेच या विभागाची जबाबदारी परीक्षा नियंत्रकांवर सोपविली. या नव्या विभागाच्या कामकाजाला गेल्या सहा दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. (प्रतिनिधी)कार्यक्षमता, गती वाढणार...परीक्षेचे कामकाज तीन विभागांकडून चालत होते. त्यात काहीवेळा संबंधित विभाग एखाद्या कामाला विलंब लागल्यास एकमेकांकडे बोट दाखवत होते. मात्र, आता परीक्षाविषयक सर्व कामकाजांची जबाबदारी परीक्षा विभागावर असल्याने आता त्याला लगाम बसणार आहे. शिवाय निकालातील दुरूस्ती तसेच अन्य बाबींसाठी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबणार आहे. संगणक केंद्र व एमकेसीएलकडे असलेली परीक्षाविषयक माहिती नव्या विभागात संकलित केली जाणार आहे. यासाठी मुख्य व्यवस्थापकीय अधिकारीपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.५६४ परीक्षा, ६५०० प्रश्नपत्रिकापरीक्षा विभागातर्फे मार्च-एप्रिल आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर या सत्रात विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ५६४ परीक्षा घेतल्या जातात. यासाठी ६५०० प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. सत्र पद्धतीमुळे परीक्षा विभागाचे कामकाज वर्षभर चालते. ते लक्षात घेऊन या विभागात नवा आयटी विभाग सुरू केल्याबद्दल शिक्षक, कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.