वाणिज्य वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:56+5:302021-01-21T04:22:56+5:30
कृषी विद्यापीठ सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बोरचाटे कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी दत्तात्रय ...

वाणिज्य वृत्त
कृषी विद्यापीठ सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बोरचाटे
कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी दत्तात्रय बोरचाटे, तर उपाध्यक्षपदी आदिका सुनील पाटील यांची एकमताने निवड झाली. (फोटो : २००१२०२१-कोल- शिवाजी बोरचाटे), (फोटो: २००१२०२१-कोल- आदिका पाटील )
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला भंडारी ग्रुपतर्फे वैद्यकीय साहित्य
कोल्हापूर : येथील प्रसिद्ध भंडारी ग्रुपचे सदस्य दर्शन हंजे यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले या महापालिकेच्या रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य देण्यात आले. यात मॉब, ट्रॉली, औषधबॉक्स या साहित्याचा समावेश आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. मंजूश्री रोहिदास यांनी हे साहित्य स्वीकारले. यावेळी भंडारी ग्रुपचे जनरल मॅनेजर अक्षय नाईक, मॅनेजर अविनाश पोवार, सुशांत भंडारी, मुन्ना चौधरी, संदीप पाटील, अमोल पाटील, विजय देसाई, शिवम जंगम, अनिकेत गायकवाड, सोमनाथ दिवटे, सागर शिंगटे उपस्थित होते. (फोटो: २००१२०२१-कोल-भंडारी ग्रुप )
महेंद्र ज्वेलर्सतर्फे महिलांचा ‘ग्रेट ताई’ म्हणून होणार सन्मान
कोल्हापूर : नोकरीच्या निमित्ताने रोज ६० किलोमीटर प्रवास करून घर ते नोकरी असा ताळमेळ साधणाऱ्या महिलांचा महेंद्र ज्वेलर्सतर्फे ‘ग्रेट ताई’ म्हणून गौरव होणार आहे. महेंद्र ज्वेलर्सच्या ११६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या २० फेब्रुवारीला हा आगळावेगळा सत्कार सोहळा होणार आहे.
महिंद्रा ज्वेलर्सने व्यवसायासोबत कायमच सामाजिक बांधीलकीही जपली आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणखी एक उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. नोकरीच्या निमित्ताने रोज लांबचा प्रवास करणाऱ्या निवडक महिलांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या कष्टाची जाणीव इतरांना व्हावी हा यामागचा उद्देश आहे. अशा महिलांनी ८५९६८५८५९६ या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी वर्धापन दिनानिमित्त सकाळी ग्राहक रंगराव कृष्णा मगदूम, सुनीता शिवगोंडा पाटील, अनुराधा रांगणेकर, सीए आनंद बाबूराव पल्लोडी, साक्षी पल्लोडे, नितीन दिनकरराव ठिपकुर्ले, वैशाली ठिपकुर्ले यांच्या उपस्थितीत विशेष सोहळा साजरा करण्यात आला.
फोटो: २००१२०२१-कोल-महेंद्र न्यूज