पशुवैद्यकीय अधिकारी निवासस्थान बांधकामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:24+5:302021-02-09T04:27:24+5:30

हलकर्णी : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील आधारभूत पशुवैद्यकीय ग्राम उपकेंद्र येथे जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या ...

Commencement of construction of veterinary officer's residence | पशुवैद्यकीय अधिकारी निवासस्थान बांधकामाला प्रारंभ

पशुवैद्यकीय अधिकारी निवासस्थान बांधकामाला प्रारंभ

हलकर्णी : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील आधारभूत पशुवैद्यकीय ग्राम उपकेंद्र येथे जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रेखाताई हत्तरकी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रूपाली कांबळे होत्या.

सुनील भुईंबर यांनी प्रास्ताविकात या निवासस्थानामुळे अधिकाऱ्यांची चांगली सोय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही २४ तास सेवा मिळेल, असे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य रेखाताई हत्तरकी यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा वेळेत मिळाव्यात, यासाठी निवासस्थान बांधकामाला निधी मिळवून देत बांधकाम त्वरित सुरु करुन आपल्या कामातील तत्परता दाखवली. त्यामुळे शेतकरी आपले सदैव ऋणी राहतील, असे सांगितले.

यावेळी उपसभापती इराप्पा हसुरी, सातगोंडा जिन्नांनावर, गोपाळ कदम, तानाजी नौकुडकर, भागोजी कागिणकर, सुरेश कागिणकर, विजय हिरेमठ, काशाप्पा जोडगुद्री, भारती रायमाने आदी उपस्थित होते. सविता घस्ती यांनी आभार मानले.

Web Title: Commencement of construction of veterinary officer's residence