शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या अन्ननलिकेतील नाणे, फुप्फुसातील खोबऱ्याचा तुकडा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:27 IST

CprHospital Kolhapur=एका बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे आणि दुसऱ्या चिमुकल्याच्या फुप्फुसामध्ये अडकलेला खोबऱ्याचा तुकडा काढण्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही कामगिरी करून दाखविली आहे.

ठळक मुद्देचिमुकल्याच्या अन्ननलिकेतील नाणे, फुप्फुसातील खोबऱ्याचा तुकडा काढला सीपीआरच्या कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या डॉक्टरांची कामगिरी

कोल्हापूर : एका बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे आणि दुसऱ्या चिमुकल्याच्या फुप्फुसामध्ये अडकलेला खोबऱ्याचा तुकडा काढण्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही कामगिरी करून दाखविली आहे.कागल येथील दोन वर्षांच्या मुलीला श्वास घेताना त्रास होत असल्याने ३० एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता सीपीआरमध्ये आणण्यात आले. खोबऱ्याचा तुकडा खाताना मुलीला ठसका लागल्याचे पालकांनी सांगितले. श्वास घेण्यास तिला त्रास होत असल्याने ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागली. तातडीने एक्सरे काढण्यात आला. फुप्फुसे निकामी होण्याचा धोका असल्याने लहान मुलांच्या डॉक्टरना बोलावून भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि फुप्फुसात अडकलेला खोबऱ्याचा तुकडा काढण्यात आला. ५ एप्रिलला या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला.राधानगरी तालुक्यातील धामणवाडी येथील चार वर्षांच्या मुलाने एक रुपयाचे नाणे गिळल्याचा संशय आल्याने सीपीआर रुग्णालयामध्ये आणण्यात आले. त्याला उलट्याही झाल्या होत्या. एक्सरे काढल्यानंतर अन्ननलिकेच्या सुरुवातीलाच हे नाणे अडकल्याचे एक्सरेमध्ये स्पष्ट दिसत होते. पूर्ण भूल देऊन अखेर हे नाणे काढण्यात आले. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर, भूलशास्त्र डॉ. उल्हास मिसाळ यांनी या शस्त्रक्रिया केल्या. खासगी रूग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च आला असता. या विभागाच्या वतीने अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात येत आहेत. 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर