शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

मोहरममध्ये पंजे भेट, मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:23 IST

गणेशोत्‍सव व मोहरम हे दोन्हीही उत्सव एकाच वेळी असल्‍याने पोलीस प्रशासनावर दुहेरी जबाबदारी आहे. मोहरममध्‍ये गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्‍येकाने घ्‍यावी. पंजे भेटीसाठी बाहेर काढण्यात येऊ नयेत. कोणत्‍याही मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार नाही अशा स्पष्ट सूचना शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी  पीर-पंजे स्‍थापना करणाऱ्या मंडळांना केल्‍या.

ठळक मुद्देमोहरममध्ये पंजे भेट, मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंधशहर पोलीस उपअधीक्षक : गर्दी करू नये; पीर-पंजे स्थापना मंडळांना सूचना

कोल्हापूर : गणेशोत्‍सव व मोहरम हे दोन्हीही उत्सव एकाच वेळी असल्‍याने पोलीस प्रशासनावर दुहेरी जबाबदारी आहे. मोहरममध्‍ये गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्‍येकाने घ्‍यावी. पंजे भेटीसाठी बाहेर काढण्यात येऊ नयेत. कोणत्‍याही मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार नाही अशा स्पष्ट सूचना शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी  पीर-पंजे स्‍थापना करणाऱ्या मंडळांना केल्‍या. बैठकीस लक्ष्‍मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध तालीम संस्‍था, तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्‍थित होते.मोहरम उत्सवाला दि. २१ ऑगस्‍टपासून प्रारंभ होत आहे. कोरोना संकटात कोठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे. यंदाच्या वर्षी मोहरममधील पंजे भेटींना पोलीस प्रशासन परवानगी देणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. खाई फोडणे विधी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, पंजे विसर्जन जागीच करण्‍याची सूचनाही यावेळी करण्‍यात आली. बैठकीत, पोलिसांच्‍या सूचनांचे पालन करण्‍यावर मंडळांचेही एकमत झाले.बैठकीला ओंकार शिंदे, सचिन पंडत, जहांगीर पंडत, प्रवीण डोंगरे, साईश परमाळे, रवी कोवाडकर, पिंटू परमाळे, अनंत सरनाईक, दशरथ भोसले, परवेज जमादार, सिद्धेश सावंत, केदार खवरे, महेश कदम, विशाल साळोखे, शांताराम इंगवले, रोहित पंडत, आदी उपस्‍थित होते. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर