लसीकरणास नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे : बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:47+5:302021-09-10T04:29:47+5:30

महापालिकेकडे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली तरी लसीकरणात नागरिकांचा उत्साह दिसून येत नाही. नागरिक लस घेण्यास टाळत असावेत, अशी ...

Citizens should come forward for vaccination on their own: Balkwade | लसीकरणास नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे : बलकवडे

लसीकरणास नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे : बलकवडे

महापालिकेकडे लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली तरी लसीकरणात नागरिकांचा उत्साह दिसून येत नाही. नागरिक लस घेण्यास टाळत असावेत, अशी शंका प्रशासनास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकांनी हे आवाहन केले आहे. सध्या गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सवात नागरिक एकमेकांच्या नातेवाइकांकडे भेटायला जातात. अशावेळी लसीकरण झाले तर संसर्ग होणार नाही. नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन बलकवडे यांनी केले.

दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविशिल्डचे २०५५ नागरिकांचे लसीकरण झाले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर १२ व १८ ते ४५ वर्षांपर्यंत १५४७ नागरिकांचे, तर ४५ ते ६० वर्षांपर्यंत ३६२ नागरिकांचे व ६० वर्षांवरील १३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

उद्या, शनिवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांनीच महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रांवर लसीकरण होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Web Title: Citizens should come forward for vaccination on their own: Balkwade