शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिकनगुनिया, डेंग्यूसोबत कोल्हापूरात या व्हायरल तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 14:01 IST

कोल्हापूर शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. व्हायरल तापामध्ये चिकनगुनियासदृश्य लक्षणे दिसून येत असून रक्ततपासणी मात्र निगेटिव्ह येते. यामुळे नेमका हा आजार काय आहे, हा प्रश्न रुग्णांसह वैद्यकीय क्षेत्रालाही पडला आहे.

ठळक मुद्देचिकनगुनिया, डेंग्यूसोबत व्हायरल तापाची साथमंगळवार पेठेत सर्वाधिक रुग्ण, रक्ततपासणीमधूनही निदान नाही

कोल्हापूर : शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. व्हायरल तापामध्ये चिकनगुनियासदृश्य लक्षणे दिसून येत असून रक्ततपासणी मात्र निगेटिव्ह येते. यामुळे नेमका हा आजार काय आहे, हा प्रश्न रुग्णांसह वैद्यकीय क्षेत्रालाही पडला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि सर्वांशी डोकेदुखी ठरलेला व्हायरल ताप यांचे रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे एकाला ताप आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होत आहे. विशेषत: मंगळवार पेठ येथे या साथीचे रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.

येथील बालाजी पार्क परिसरात मागील महिन्यात हातापायाला सूज येणे, ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले होते आता रामानंदनगर, जरगनगर परिसरात हीच लक्षणे असणारे रुग्ण वाढले आहेत.डासांच्या उत्पत्तीला सध्याचे वातावरण पोषक असल्यामुळे या साथीच्या आजारांना खतपाणी मिळत असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे.डेंग्यूच्या रुग्णांतही वाढकोरोनासंकट असतानाच इतर साथीचे आजारही मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. यामध्ये डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढली आहे. खासगी आणि सरकारी लॅबमधून तपासणी केलेल्या ३०४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.

चिकनगुनिया सदृश्य तापाची साथ शहरात आली आहे. हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. रक्ताचा नमुना तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह येतो. अशा रुग्णांनी भीती न बाळगता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. पुरेशी विश्रांती आणि औषधे घेतल्यानंतर हा आजार कमी होतो.-डॉ. श्रीकांत शिंदे, बेलबाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर