चंद्रकांत पाटील यांची भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:12+5:302021-08-18T04:30:12+5:30

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिवसभर शासकीय विश्रामगृहावर निवडक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जयसिंगपूर ...

Chandrakant Patil's discussion with BJP office bearers | चंद्रकांत पाटील यांची भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

चंद्रकांत पाटील यांची भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिवसभर शासकीय विश्रामगृहावर निवडक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जयसिंगपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल पुतळा समितीच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

दुपारी सुहास लटोरे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी चर्चा केली. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी, आजरा अर्बन बँकेेचे संचालक विलास नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, जि.प. सदस्य हेमंत कोलेकर, वीरशैव बँकेचे संचालक महादेव साखरे यांनीही पाटील यांची भेट घेतली.

सांगली भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, संजय परमणे यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील सिनेटचे सदस्य एस.जी. कुलकर्णी, अमित कुलकर्णी यांनीही भेट घेऊन चर्चा केली. जयसिंगपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा देण्यासाठी पाटील यांचे सहकार्य लाभल्याने शिरोळ तालुका भाजपचे अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्यासह चंद्रकांत जाधव, बजरंग खामकर, राहुल पाटील, संजय चव्हाण, मिलिंद भिडे, रमेश यळगूडकर यांनी पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला.

१७०८२०२१ कोल चंद्रकांत पाटील ०१

जयसिंगपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा हस्तांतरित करण्यास सहकार्य केल्याबद्दल माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला.

Web Title: Chandrakant Patil's discussion with BJP office bearers