केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण घावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:51+5:302021-05-23T04:23:51+5:30

साके : कायद्याच्या तांत्रिक बाबी दूर करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले ...

The central government should give reservation to the Maratha community | केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण घावे

केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण घावे

साके : कायद्याच्या तांत्रिक बाबी दूर करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल राजकीय डावपेच न करता सर्वांनी एक दिलाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम केल्यास मराठा समाजाला निश्चित न्याय मिळेल आरक्षणाला राजकीय रंग न देता सर्वच पक्षांच्या समन्वयातून हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी केले .

व्हनाळी ता कागल येथील कै मेजर आनंदराव घाटगे आयटीआयमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

घाटगे म्हणाले छत्रपती शाहू राजे यांनी यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले होते त्याच बरोबर १९४२ मध्ये तत्कालीन बॉम्बे सरकारने मराठा समाजाचा समावेश मागास वर्गात केला होता आजमितीस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ५३ मोर्चे काढण्यात आले होते. तेव्हा केंद्र सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही छत्रपती संभाजीराजे सोबत सदैव राहणार आहोत. सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही माजी आमदार संजय घाटगे यांनी दिला

या पत्रकार परिषदेस ,गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,

निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, दत्तोपंत वालावलकर , धनाजी गोधडे, काकासो सावडकर,ए .वाय. पाटील,के. के. पाटील,एम. बी. पाटील, भैरू कोराने, विलास पवार, महेश देशपांडे ,विष्णूपंत गायकवाड, संतोष ढवण श्रीराम मांडरेकर आदी उपस्थित होते.

माजी आमदार संजय घाटगे यांचा एक छोटा फोटो घ्यावा

Web Title: The central government should give reservation to the Maratha community