शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

काजूबियांची आवक मंदावली; प्रक्रिया उद्योजक धास्तावले

By admin | Updated: April 13, 2015 00:09 IST

काजू उद्योगाची समस्या : अवकाळीमुळे मुळातच काजूचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा घटले

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरी अद्याप बाजारपेठेत स्थानिक काजूबियांची आवक समाधानकारक न झाल्याने चंदगड-आजरा तालुक्यांतील काजू बी उत्पादक धास्तावले असून, अनेकांना कच्च्या मालाअभावी यावर्षी काजू उद्योग बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.प्रतिवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे स्थानिक काजूबियांची आवक सुरू होते. दरम्यान, कोकणातीलही कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असतो. यावर्षी अवकाळी व लांबलेला पाऊस, हवामानातील स्थित्यंतरे यामुळे मुळातच काजूचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे.चंदगड, आजरा तालुक्यांत काजूचे असणारे प्रचंड उत्पादन लक्षात घेऊन या दोन तालुक्यांसह गडहिंग्लज तालुक्यातही सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लहान-मोठे काजू बी प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. गेल्यावर्षी काजूगराच्या होलसेल विक्रीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे काजू प्रक्रिया उद्योग कसेबसे सावरले होते. अनेक उद्योजकांनी साठा केलेला कच्चा माल प्रक्रिया न करताच बाहेरील उद्योजकांना विक्री करण्यास प्राधान्य दिले होते.यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. कच्चा मालच बाजारात पुरेसा उपलब्ध नसल्याने बी प्रक्रिया युनिट चालविण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठे उद्योजक इंडोनेशिया, आफ्रिका, ब्राझील आदी ठिकाणांहून येणाऱ्या आयात काजूबिया खरेदीस प्राधान्य देताना दिसत आहेत; पण लहान उद्योजकांची मात्र फरफट होताना दिसत आहे. एकंदर काजू बी उत्पादनात झालेली घट प्रक्रिया उद्योजकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.शेकडो कुटुंबीयांचे संसार अडचणीतकाजूबागांची राखण करणे, काजूबिया गोळा करणे, वाहतूक करणे, खरेदी-विक्री करणे यासह काजूप्रक्रिया उद्योगावर शेकडो कुटुंबीयांचे संसार अवलंबून आहेत. काजू प्रक्रिया उद्योग बंद झाल्यास शेकडो कुटुंबीय अडचणीत येणार आहेत.उद्योजकांनी घाबरू नये : पोवारकाजूबियांचे उत्पादन कमी झाले म्हणून स्थानिक तरुण उद्योजकांनी घाबरू नये. आयात काजूबिया मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक व आयात मालाची सांगड घालूनच प्रक्रिया उद्योग चालू ठेवावेत, असे आवाहन ज्येष्ठ काजू बी प्रक्रिया उद्योजक महादेव पोवार यांनी केले आहे.उद्योजकांनी घाबरू नये : पोवारकाजूबियांचे उत्पादन कमी झाले म्हणून स्थानिक तरुण उद्योजकांनी घाबरू नये. आयात काजूबिया मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक व आयात मालाची सांगड घालूनच प्रक्रिया उद्योग चालू ठेवावेत, असे आवाहन ज्येष्ठ काजू बी प्रक्रिया उद्योजक महादेव पोवार यांनी केले आहे.