शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बसची जीपला धडक

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

शिवाजी विद्यापीठ चौकातील घटना : चार वर्षांच्या बालकासह नऊजण गंभीर जखमी

कोल्हापूर : शरदवाड (ता. कागल) येथे नातवाच्या बारशाला चाललेल्या जीपला भरधाव ट्रॅव्हल्स्ने शिवाजी विद्यापीठ चौकात जोराची धडक दिल्याने जीपमधील चार वर्षांच्या मुलासह नऊजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. मार्गावरील सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
जखमींची नावे अशी, सुशीला विठ्ठल पुजारी (वय ५०), सखुबाई कृष्णा पुजारी (४०), आंबुबाई शरद पुजारी (३५), बाळाबाई सुबाना रानगे (४०), सखुबाई नारायण धनगर (६०), आक्काताई सखाराम पुजारी (६०), नवसाबाई माळू पुजारी (४०), बाबासो विठ्ठल पुजारी (३२), राज काशिनाथ पुजारी (४, सर्व रा. वाशी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या अपघाताची माहिती समजताच वाशी व शरदवाड येथील नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. सुशीला पुजारी व सखुबाई पुजारी यांची प्रकृत्ती चिंताजनक बनल्याने त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले, वाशी येथील कृष्णात पुजारी यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी भावकीतील महिला जीपमधून शरदवाडकडे निघाल्या होत्या. जीप बाबासो पुजारी हा चालवित होता. शिवाजी विद्यापीठ चौकात येताच निपाणीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स्ने जीपला जोराची धडक दिली. यामध्ये जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यातील चार वर्षांच्या बालकासह महिला गंभीर जखमी झाल्या. डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने महिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला. विद्यापीठ परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. जखमींना जीपमधून बाहेर काढून मिळल त्या वाहनाने सीपीआरला पाठवून दिले. दरम्यान, अपघात होताचा ट्रॅव्हल्सचा चालक पसार झाला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूहोते. (प्रतिनिधी)