शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन बंधारा स्फोटाने उडविला!

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

वाळूमाफियांची मुजोरी : कांबळेश्वर येथे निरा नदीतून लाखो लिटर पाणी वाया; गुन्हा दाखल

फलटण : कांबळेश्वर (ता. फलटण) येथील निरा नदीवरील फलटण व बारामती तालुक्यांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यावरील गाळा क्रमांक २९, ३० मधील दगडी खांब मंगळवारी अज्ञातांनी जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून उडवून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंधाऱ्यातील हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पणदरे (ता. बारामती) येथील पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सतीश कोकाटे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. २६) पहाटे दोनच्या सुमारास अज्ञातांनी कांबळेश्वर (ता. फलटण) येथे निरा नदीवरील पहाटे अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले असता, त्यांनी बंधाऱ्याला मोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती तत्काळ प्रशासनाला दिली. यावेळी फलटणचे तहसीलदार विवेक जाधव, फलटण ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, फलटण काँग्रेसचे पदाधिकारी अनिल तावरे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)वाळू तस्कारांचे कारनामे?घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ‘हे कृत्य वाळू तस्करांचे असावे,’ असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या परिसरात बारामती तालुक्यातील वाळू तस्करांचा मोठा वावर असतो. संबंधित बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा असल्याने बंधाऱ्यातील पाणी कमी करुन त्यामधील वाळूसाठा काढण्यासाठीच स्फोट घडवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या गाळा क्र. २९ व ३० मधीळ दगडी खांब जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. यामुळे लोखंडी प्लेटा व लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे.