संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST2021-05-11T04:23:41+5:302021-05-11T04:23:41+5:30

इंगळी : येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन पुकारला आहे. वैद्यकीय सेवा ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इंगळी : येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन पुकारला आहे. वैद्यकीय सेवा व दूध संस्था वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्राम समितीने सांगितले.

..........

नगरपालिकेस शववाहिका प्रदान

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम कोविड १९ च्या निधीतून नगरपालिकेस टाटा कंपनीची शववाहिका सोमवारी दिली. शववाहिकेची चावी कॉंग्रेस नगरसेवकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे सुपूर्द केली. नगरपालिकेकडे दोन शववाहिका उपलब्ध आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगरसेवकांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे स्थानिक निधीतून शववाहिका मिळावी, अशी मागणी केली होती. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे,रवींद्र माने, आदी उपस्थित होते.

Web Title: Brief news