शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी व पन्हाळा हिल स्टेशन सुरक्षित आहे का?

By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST

पाहणी करून प्रशासनाने तसे जाहीर करावे

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर शहरातील ब्रह्मपुरी टेकडी व पन्हाळा येथील टेकड्यांवर होत असलेल्या घरांकडे हिंदू युवा प्रतिष्ठानने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ब्रह्मपुरी व पन्हाळा येथील टेकड्यांवर होत असलेली घरे सुरक्षित आहेत का? याची पाहणी करून प्रशासनाने तसे जाहीर करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी केले आहे. यासंदर्भात पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, ब्रह्मपुरी टेकडीवर उत्खनन झाले आहे. सध्या उत्खनन थांबले असले, तरी टेकडीवर मोठ्या प्रमाणात वसाहत निर्माण झाली आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता ही वसाहत किती सुरक्षित आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वसाहतीतील पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून नदीत उतरताना दिसते, अशा परिस्थितीत तेथील रस्त्यावरून होणारी वाहतूक व जमिनीची प्रत पाहता टेकडीचा भाग नदीकडे झुकलेला आहे. पन्हाळा परिसरात विश्रांती स्थळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. जागा किती महाग, बंगला किती कोटींचा आहे यापेक्षा डोंगर उतारावर इमारती उभ्या केल्या आहेत. अशा इमारती उभ्या करताना जमीन कोणती आहे, त्यामधील खडक कोणता आहे, इमारतीसाठी स्ट्रक्चरल इंजिनिरिंगचे तंत्र वापरले आहे काय, याची शहनिशा होण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)