शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी दोन्ही राजेंचं आतून फिक्सिंग !

By admin | Updated: November 6, 2016 00:28 IST

सुवर्णा पाटील यांच्याकडून आरोपांच्या फैरी : नगराध्यक्षपद राजघराण्याकडे राहावे म्हणूनच विरोधात अनोळखी चेहरा

सातारा : ‘मनोमिलनामुळंच साताऱ्याची पुरती दुर्दशा झालीय. सक्षम पर्याय उभा नव्हता, म्हणूनच आजपावेतो पालिकेत ठराविक टग्यांच्या टोळक्याचा कारभार चालत होता. आता पालिकेत आपली सत्ता कायम राहावी, यासाठी दोन्ही राजेंनी आतून फिक्सिंग केलंय. नगराध्यक्षपदासह अनेक ठिकाणी मातब्बर उमेदवारांविरोधात ओळख नसलेले उमेदवार मुद्दामहून उभे केले गेलेत. राजघराणे हे साताऱ्याचे मालक नाहीत. साताऱ्याच्या मातीत स्वाभिमान आहे,’ अशी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केलीय सुवर्णा पाटील यांनी. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभारलेल्या सुवर्णा पाटील यांना जेव्हा ‘लोकमत टीम’नं बोलतं केलं, तेव्हा राजघराण्यावर होत गेले एकाहून एक घणाघाती प्रहार. पालिकेत सातारा विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी पक्षाच्या आदेशानेच घेतला होता, आता पक्षाच्या आदेशानेच भारतीय जनता पार्टी सातारा पालिकेसह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व नगरपंचायतींची निवडणूक लढणार आहे, असे स्पष्ट करून सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘दोन्ही आघाड्या दहा वर्षांपासून मनोमिलनाच्या माध्यमातून सातारा पालिकेच्या सत्तेत होत्या. मनोमिलन तुटले असल्याचे दाखविले जात असले तरी पालिकेतल्या सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांनी फिक्सिंग केल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. सातारा विकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देताना समाजात वावरणारा उमेदवार दिला नाही. राजघराण्यातील उमेदवाराविरोधात ‘साविआ’ने खंबीर उमेदवार न देण्यामागे दोन्ही आघाड्यांचे गौडबंगाल असल्याची खात्री संपूर्ण शहरातील नागरिकांना पटली आहे.’पालिकेत काम करत असताना आलेल्या अनुभवांविषयी विचारले असता, सुवर्णा पाटील यांनी आघाडीतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ‘शहरातल्या नागरिकांना काय हवे हो? वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत गरजा पुरवणे पालिकेचे काम आहे. त्या पुरविण्यासाठीही आम्हाला आटापिटा करावा लागत होता. या गरजा बाजूला ठेवून काही नगरसेवकांच्या टक्केवारीचा हेतू साध्य करण्यासाठी शहराबाहेरील फिश मार्केट, गोडोली तळे, आयुर्वेदिक गार्डनसाठी पालिकेचा निधी देण्यात आला. प्रभागात मूलभूत गरजा पुरविण्यासाठी मागूनही निधी दिला गेला नाही. काही ठराविक मंडळींकडेच सर्व सूत्रे असल्याने निधी वाटपातही दुजाभाव केला गेला.’आम्ही ज्योतिर्मय फांउडेशनच्या माध्यमातून काम करतोय. महिला एकत्र येऊन महिलांना सक्षम करण्यासाठी धडपड करत असतो. कर्तव्य जे काम करतंय त्याचा बागुलबुवा मात्र कशाला केला जातोय?, असेही पाटील म्हणाल्या.अजिंक्य उद्योग समूहासाठी अनेक मोक्याच्या जागा कवडीमोल भावाने विकत घेतल्या गेल्या. अजिंक्य बझार नुकसानीत आला. तसेच अजिंक्यतारा फळे, फुले, भाजी विक्री संघाचा फायदा शेतकऱ्यांना कितपत झाला, हाही संशोधनाचा विषय आहे. साताऱ्यात अतिक्रमणे हटवितानाही दुजाभाव पाहायला मिळत असल्याचे सांगताना सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘आर्थिक तडजोडी करून पालिकेचा कारभार केला जात आहे. पोवई नाक्यावरील एका हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण वर्षानुवर्षे तसेच असताना त्याला हात घातला जात नाही; परंतु त्यासमोरच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बागेची रुंदी कमी केली जाते, यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असेल? सगळा तडजोडीचा मामला. वळचणीचं पाणी कधी आढ्याला जात नाही, अगदी त्याचप्रमाणे स्टँड परिसरातल्या मार्केट कमिटी इमारतीच्या अतिक्रमणाबाबतही झाले आहे. चुकीच्या पद्धतीने या इमारतीचे काम केले असताना राजकीय वरदहस्त दाखवून त्यावर कारवाई होत नाही. एसटी विभागीय कार्यालयाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडूनही तोडपाणी करून रस्त्याकडेची जागा त्याच्या घशात घालण्यात आली आहे.’‘आमच्या विरोधकांनी कारखाना, बँका प्रगतिपथावर आणून दाखवल्या असत्या तर सातारकरांची जी आता अवस्था झालीय, ती झाली नसती. त्यांच्या अडचणीत आलेल्या बँक ठेवीदारांची अवस्था सध्या दयनीय आहे, असेही सुवर्णा पाटील यांनी स्पष्ट केले. ‘वर्षानुवर्षे साताऱ्यात सत्ता असतानाही दोन्ही येथील औद्योगिक वसाहत वाढली नाही. साताऱ्यात रोजगार उपलब्ध होत नसल्याने सुशिक्षित व तंत्रकुशल झालेले तरुण-तरुणी शहराबाहेर पडत आहेत. पुणे-मुंबईत जाऊन त्यांना ओढाताण करत नोकरी करावी लागते. हे मनोमिलनाचे मोठे अपयश आहे. अजिंक्यतारा फळे-फुले, भाजी विक्री संघाचा किती शेतकऱ्यांना फायदा करून दिला, हे संपूर्ण जनतेला ज्ञात आहे. खटाव तालुक्यातील जवानाच्या मुलाला शाहू अ‍ॅकॅडमीत फी सवलत देण्याची घोषणा केली; मात्र ती दिली नाही. वेदांतिकाराजे भोसले यांना सर्वसामान्यांबद्दल देणे-घेणे नाही. त्या अत्यंत हेकेखोर आहेत. आपण सक्षमपणे पालिकेचा कारभार करू, असे म्हणून त्यांनी आधीच्या महिला नगराध्यक्षांचा अपमान केला आहे. त्यांच्या ‘इगो’मुळे साताऱ्याचे काय भले होणार आहे? साताऱ्याच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीतच कौल दिला आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. (लोकमत टीम)पतीदेवाच्या कर्तृत्वाबद्दल मात्र सारवासारवपालिका आवारात आपल्याच पक्षाच्या शिवसैनिकाला मारहाण असो की, सार्वजनिक ठिकाणी विधिनिषेध न बाळगता खुलेआमपणे एखाद्याचा उद्धार असो... अशा अनेक अचाट प्रयोगामुळे नेहमीच चर्चेत असणारे नरेंद्र पाटील यांच्या ‘कार्यकर्तृत्वा’बद्दल ‘लोकमत टीम’नं थेटपणे विचारलं, ‘आपल्या पतीदेवाने आजपर्यंत अनेक हितचिंतक निर्माण करुन ठेवल्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्याला तोटा होणार नाही का ? ’ ...यावर मात्र सुवर्णा पाटील यांनी सारवासारव केली, ‘ते वरुन जरी बोलायला कठोर असले तरी आतून मऊ आहेत. उलट आज मी त्यांच्यामुळेच इथंपर्यंत येऊ शकले. यंदाच्या निवडणुकीत मी प्रचारात असले तरी पडद्यामागं राहून तेच सूत्रं हलविणार आहेत.’आमच्यामुळे टगे बिनविरोध निवडले गेलेपाच वर्षांपूर्वी भाजपने मनोमिलनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आमच्यामुळेच अनेक टगे पालिकेत बिनविरोध निवडून आले, अशी खंतही सुवर्णा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनीच माझी उमेदवारी जाहीर केलीआपल्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होता, हे आठवून दिल्यानंतर पाटील म्हणाल्या, ‘पद मिळावे, असे प्रत्येकालाच वाटते. हत्ती हा हत्तीच्या चालीने चालत असतो. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उमेदवारी दिली आहे.’टक्केवारीच्या टेंडरला एकसुरात एकमुखी पाठिंबा असायचा होेऽऽ...पाच वर्षे तुम्ही मनोमिलनाच्या माध्यमातून पालिकेच्या सत्तेत होता, मग आताच सत्ताधाऱ्यांविरोधात बोलण्याचा तुम्हाला साक्षात्कार कसा झाला?, या गुगली प्रश्नावर उत्तर देताना सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘मी वेळोवेळी विषय मांडले. मी व अमित कुलकर्णी असे दोनच भाजपचे उमेदवार निवडणुकीत होतो. त्यातून मी एकटे निवडून आले. आमचे संख्याबळ अपुरे असल्याने प्रखर विरोध करता आला नाही, हे मान्य करते; परंतु वेळावेळी सभागृहात आवाज उठवून वाईट कामांना विरोध केला. माझा प्रभाग मोठा असल्याने निधीची गरजही मोठी होती. मात्र, काही ठराविक नगरसेवकांचं टोळकं दोन्ही वाड्यांवरील आदेशाचं तुणतुणं वाजवत असे. १०० विषय अवघ्या पाच मिनिटांत मंजूर होतात, यातूनच तुम्ही ओळखा, कसा कारभार चालत असेल ते. टक्केवारीचं टेंडर असलं की मंजूर म्हणून एका सुरात आवाज होत होता.’मीच आमदार... मीच नगराध्यक्ष; असं कसं शक्य ? मी एक सर्वसामान्य घरातील गृहिणी. जर मला माझं स्वयंपाकघर व्यवस्थित हाताळता येत असेल तर साताऱ्याचा कारभार का शक्य नाही ? केवळ मी कॉमन लेडीज म्हणून सक्षम नाही का ? मीच आमदार अन् मीच नगराध्यक्ष.. असं कसं सातारकर सहन करतील ?