शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सीमावासीयांनीही जागविली मराठी अस्मिता

By admin | Updated: October 16, 2016 00:18 IST

कोल्हापूर : गेली चाळीस वर्षे सातत्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय मागणीला सक्रिय

पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या करवीरकरांच्या हाकेला प्रतिसाद देत शनिवारी निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाला सीमाभागातील सुमारे पन्नास हजार मराठा बांधवांनी उपस्थिती लावून मराठी अस्मितेची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली. कर्नाटकातील मराठा समाजालाही आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी सीमाभागातील मराठा बांधवांनी यानिमित्ताने केली. बेळगावच्या महापौर सरिता विराज पाटील, उपमहापौर संजय शिंदे, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नगरसेविका रेणू मुतगेकर, सुधा भातखंडे, विजय भोसले, विनायक गुंजटकर, गटनेते पंढरी परब, किरण सायनाक, किरण गावडे, नूतन गायकवाड, प्रकाश मिरगाळे, अमीन देसाई, डॉ. विराज पाटील, मंगेश देसाई, गायत्री देसाई, आदींनी सीमाभागातील मोर्चेकऱ्यांचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे महापौर सरिता पाटील या शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात येऊन दाखल झाल्या होत्या. त्यांचे स्वागत महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. बेळगाव महापालिका हद्दीत एकूण ५८ प्रभाग असून, त्यापैकी ३२ प्रभागांत मराठी गटाचे नगरसेवक निवडून आले आहेत. ३२ प्रभागांतील नगरसेवकांनी चार-चार बसेसमधून त्यांचे कार्यकर्ते आले होते. त्याशिवाय बेळगाव ग्रामीणमधूनही असंख्य कार्यकर्ते आले होते. सीमाभागातून आलेल्या सर्व मराठी बांधवांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संभाजीनगर एनसीसी आॅफिसजवळ करण्यात आली होती, तर श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चहा व नाष्ट्याची सोय केली होती. सवलतींची मलमपट्टी नको मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाला शैक्षणिक सवलती जाहीर केल्या आहेत. फडणवीस यांनी अशा सवलती जाहीर करून मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका महापौर सरिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. आम्हाला सवलती नको आहेत. सरकारी नोकरीत आणि शिक्षणक्षेत्रात आरक्षण पाहिजे आहे. नुसतीच मलमपट्टी नको. आमच्या मराठा शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कोपर्डीतील अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या घटनेचा मी निषेध करते. महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.