शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून तरुणाचा खून

By admin | Updated: June 2, 2015 01:24 IST

वाठारजवळील घटना : पोखलेच्या एकावर गुन्हा; संशयित आरोपीचे पलायन

पेठवडगाव : पत्नीस मिसकॉल करण्याबरोबरच बांधकामाच्या पैशाच्या वादातून झालेल्या मारामारीत शरीफ इक्बाल पटाईत (वय २७, रा. वाठार तर्फ वडगाव) याचा खून झाला. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास वाठार येथील साखरवाडी येथे घडली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी बालम पठाण (रा. पोखले) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. घटनास्थळ व पेठवडगाव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वाठार येथील साखरवाडी वसाहतीत शरीफ पटाईत याचे घर आहे. सोमवारी दुपारी त्याचा पोखले (ता. पन्हाळा) येथील नातेवाईक बालम पठाण कामानिमित्त आला होता. पठाण यास बांधकाम करण्याचे काम दिले होते; पण त्याने अर्धेच बांधकाम केले. या कामाचे पैसे पटाईत यांनी भागवले होते. उर्वरित काम पटाईत याने अन्य गवंड्यामार्फत पूर्ण करून घेतले. दरम्यान, बालम पठाण, त्याचे वडील गुलाब, भाऊ जमाल वरचेवर फोन करून वारंवार पैशाची मागणी करत तसेच शिवीगाळ करीत. त्यामुळे पठाण व पटाईत यांच्यात तणाव होता. सोमवारी (दि. १ जून) दुपारी दीड वाजता बालम पठाण घरी आलाहोता. यावेळी त्याने शरीफ यास बायकोस मिसकॉल करतो, यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी शरीफने मिसकॉल केला नाही, असे सांगत असताना, पठाण याने थोबाडीत मारली. तसेच डोक्याचे केस धरून डोके सिंमेटच्या चौकटीवर आदळले. त्यामुळे शरीफ हा कपाळावर मार लागल्यामुळे जखमी झाला. त्यानंतर पठाण हा मोटारसायकलवरून पळून गेला. जखमी शरीफला उपचारासाठी वडगाव येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तथापि डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी नवे पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. याबाबत रमजान इक्बाल पटाईत याने पोलिसांत फिर्याद दिली. तपास पोलीस उपअधीक्षक चिन्मय पंडित, सहाय्यक फौजदार शिवाजी कोळी करीत आहेत. वर्षापूर्वी शरीफचे लग्न शरीफ हा सध्या फॅब्रिकेशनची कामे करीत होता. तसेच चार वर्षांपूर्वी दुबई येथे नोकरीस होता. वर्षापूर्वी लग्नासाठी भारतात परतला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. शरीफ याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. घटनेने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.