मनपाडळेत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST2021-04-18T04:22:41+5:302021-04-18T04:22:41+5:30

नवे पारगाव : मनपाडळेत (ता. हातकणंगले ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर झाले. बौद्ध मंदिरात ...

Blood donation camp in Manpadle | मनपाडळेत रक्तदान शिबिर

मनपाडळेत रक्तदान शिबिर

नवे पारगाव : मनपाडळेत (ता. हातकणंगले ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर झाले.

बौद्ध मंदिरात भीम ज्योतीची प्रतिष्ठापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

रक्तदान शिबिर झाले. मंडळाचे अध्यक्ष सतीश कांबळे, उपाध्यक्ष सतीश वाघमारे, अमर वाघमारे, सतीश कुरणे, अनिल वाघ, विजय कुरणे, अक्षय कांबळे, विक्रम वाघमारे यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.

फोटो :मनपाडळेत (ता. हातकणंगले ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती रक्तदान शिबिराचा प्रारंभ प्रसंगी समता ध्वजाचे ध्वजारोहण करताना उपसरपंच उल्हास वाघमारे.

Web Title: Blood donation camp in Manpadle