शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजाला फसविल्यानेच भाजपचा पराभव : मकरंद कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये, असे सांगूनही भाजपच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला गृहीत धरू नये, असे सांगूनही भाजपच्या नेत्यांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजातील मतदारांनी एकमुखी विचार केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या परंपरागत मतदारसंघात त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला, असा दावा ब्रह्म महाशिखर परिषदेचे समन्वयक मकरंद कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

मकरंद कुलकर्णी म्हणाले, ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासह अन्य मागण्या आम्ही करत आहोत; पण मागच्या पाच वर्षांत सत्तेत असताना भाजप सरकारने समाजासाठी काहीच केले नाही. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या ब्रह्म महाशिखर परिषदेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. कोल्हापुरातील गोलमेज परिषदेतही जे कोणी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विचार करतील, त्यांना मदत केली जाईल याचा पुनुरुच्चार केला होता. भाजपच्या नेत्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मेधाताई कुलकर्णी यांची आमदारकी हिरावून घेतली. मिलिंद संपगावकर, शेखर चरेगांवकर यांना केवळ ब्राह्मण म्हणून उमेदवारी नाकारली. त्याचाच फटका भाजपच्या उमेदवारांना बसला, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

-----------------------------

देवेंद्र फडणवीस कार्यशून्य नेतृत्व..

मकरंद कुलकर्णी म्हणाले, ज्या पक्षाच्या जिवावर नेते मोठे झाले; पण त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कार्यशून्य माणसाने मागण्या जाणून घेण्याचेही सौजन्य दाखविले नाही. त्यांनी समाजाची फसवणूक केली. यापुढेही कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद महानगरपालिकेत समाजाला दुखावल्याचे परिणाम पाहायला मिळतील.

-----------------------------

नेत्यांची मग्रुरी उतरवली

मकरंद कुलकर्णी म्हणाले , भाजपच्या नेत्यांना प्रचंड मग्रुरी आली होती. जर पराभव झाला तर हिमालयात जातो, असे नेते बोटांच्या चिटक्या वाजवून म्हणत होते. कसली ही मग्रुरीची भाषा. राजकारणात इतकी मग्रुरी चालत नाही, हेच आम्ही दाखवून दिले.