Kolhapur Flood: पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या सोमवारी भाजपचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:08 PM2022-05-24T12:08:33+5:302022-05-24T12:09:14+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना आठ फूट उंचीची खुर्ची देऊया. म्हणजे महापुराच्या काळात त्यांना त्यांच्याच कार्यालयात बसून काम करता येईल अशी उपरोधिक टीका बाबा इंदूलकर यांनी केली.

BJP morcha next Monday for pending issues of flood victims | Kolhapur Flood: पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या सोमवारी भाजपचा मोर्चा

Kolhapur Flood: पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या सोमवारी भाजपचा मोर्चा

Next

कोल्हापूर : महापूर येऊच नये अशी अपेक्षा आहे. परंतु आलाच तर तयारी हवी. ऐनवेळी धावपळ नको म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. पूरग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सोमवारी (दि. ३० मे) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सोमवारी येथे पक्षाच्या बैठकीत झाला.

यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, सन्मती मिरजे, प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, प्रत्येक तालुकाध्यक्षांनी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी काय पूर्वतयारी केली आहे याची विचारणा करावी. आवश्यक बाबींची यादी करून त्यानुसार वेगवेगळ्या समित्या तयार करा.

यावेळी सुनील कदम, महादेव खोत, भगवान काटे, संदीप देसाई, शैलेश पवार, संभाजी पाटील चिखली, बंडा साळोखे, उदय गायकवाड, माणिक पाटील चुयेकर, विशाल शिराळकर, राजवर्धन निंबाळकर यांनी विविध सूचना केल्या.

नितीन गडकरींना भेटण्याचा निर्णय

राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून यासाठीची उपाययोजना आवश्यक असल्याचे मत सत्यजित कदम यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांना आठ फुटांची खुर्ची द्या

नोव्हेंबर २०२१ मध्ये सत्यजित कदम आणि मी शहरातील पूर येणाऱ्या ठिकाणांना भेटी दिल्या. आयुक्तांना डिसेंबरमध्ये निवेदन दिले त्यानंतर त्यांनी काहीही केले नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आठ फूट उंचीची खुर्ची देऊया. म्हणजे महापुराच्या काळात त्यांना त्यांच्याच कार्यालयात बसून काम करता येईल अशी उपरोधिक टीका बाबा इंदूलकर यांनी केली.

Web Title: BJP morcha next Monday for pending issues of flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.