शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला गरिबांशी काही

By admin | Updated: October 19, 2015 23:51 IST

देणेघेणे नाही : हसन मुश्रीफ

कागल : ‘अच्छे दिन आनेवाले है’, असे म्हणत सत्तेवर आलेले भाजप सरकार उद्योगपती, श्रीमंत लोकांच्याच हिताचे निर्णय घेत असून, या लोकांना गोरगरिबांशी काही देणेघेणे नाही. डाळींच्या किमती गगनाला भिडल्या असून, दीपावलीला लोकांना डाळ मिळणार की नाही, अशी परिस्थिती झाली आहे, असे प्रतिापादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. वंदूर (ता. कागल) येथील सामाजिक कार्यकते करणसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉ. दिलीप पवार होते. वाळव्याचे वैभव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. संभाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, करणसिंह घाटगे यांनी स्वत:च्या खिशाला चाट देत गावात उभी केलेली कामे, उपक्रम कोतुकास्पद आणि तरुणांना प्रेरणादायी आहेत.करणसिंह घाटगे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ हेच माझे प्रेरणास्थान आहेत. मी त्यांना पाहतच मोठा झालो आहे. त्यांच्या कामाचा धडाका, सामान्य जनतेबद्दलची तळमळ पाहून मी पण थोडेफार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. वंदूर परिसरात यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार आहे. वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप,जनरल चेकअप औषधोपचार कार्यक्रम घेतले. नगरसेवक प्रवीण गुरव, धनाजीराव घाटगे, बबन खोडवे, तानाजी बागणे, उत्तम कांबळे, नामदेवरा चौगुले, बाळासो लोकरे, विजयसिंह इंगळे, बाबूराव हेचनाळे, बाबूराव बागणे, गणपती कांबळे, सदाशिव स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)शिवसैनिक मोठ्या मनाचेशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. संभाजीराव नाईक आमदार मुश्रीफांचे कौतुक करीत. ते जर शिवसेनेत असते, तर शिवसेनाप्रमुखांनी त्यांना मुख्यमंत्रीही केले असते, असे उद्गार काढले. याचा संदर्भ घेत आमदार मुश्रीफ म्हणाले, शिवसैनिक कडवट आणि मोठ्या मनाचे असतात. जे बोलतात ते स्पष्ट बोलतात. हातचे काही राखून ठेवत नाहीत.