शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस कार्यक्रमात घुसून हल्ला; पाच गंभीर

By admin | Updated: June 23, 2015 01:00 IST

आठजणांवर गुन्हा : माजी नगरसेविका रेखा आवळेंच्या मुलाचा सुरू होता वाढदिवस

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून कदमवाडी, कपूर वसाहतीमध्ये माजी नगरसेविका रेखा अनिल आवळे यांच्या मुलाच्या वाढदिवस कार्यक्रमात सात ते आठजणांनी घुसून केलेल्या खुनी हल्ल्यात पाचजण गंभीर जखमी झाले. जॉनी गौतम मोहिते (वय २४, रा. जाधववाडी), अजिज राजू शेख (१९), सतीश परशुराम नलवडे (१९), विकी नागेश वडर (१९), सनी तिम्मा वडर (१९, सर्व रा. विचारेमाळ) अशी जखमींची नावे आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात तणाव पसरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत जखमी जॉनी मोहिते याने सीपीआर पोलिसांना सांगितले, माजी नगरसेविका रेखा आवळे यांचा मुलगा धीरज याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सोमवारी रात्री सुरू होता. (त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अचानक संशयित आरोपी अमर मुंगळे, साजन मुंगळे, आकाश मुंगळे, रोहन मुंगळे, करण मुंगळे आदींसह सात ते आठजण वाढदिवस कार्यक्रम सुरू असताना घुसले. त्यांनी माझ्या डोक्यात कोयत्याने वार केला. मी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळलो. यावेळी त्यांनी माझे मित्र अजित शेख, सतीश नलवडे, विकी वडर, सनी वडर आदींवरही हल्ला चढविला. त्यानंतर ते पळून गेले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)पोलिसांचे संचलनया हल्ल्यानंतर कदमवाडी, विचारेमाळ येथील तरुणांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात संचलन केले. त्यानंतर रात्री उशिरा जॉनी मोहिते याने संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली.