दुचाकीचालकास मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:23+5:302021-09-15T04:28:23+5:30

कोल्हापूर : एकाच गाडीवरून कोल्हापुरात जाताना निर्जन रस्त्यावर दुचाकी थांबवून पाठीमागे बसलेल्याने दुचाकीचालकास काठीने बेदम मारहाण केली. त्याच्याकडील ४५ ...

The biker was beaten and robbed | दुचाकीचालकास मारहाण करून लुटले

दुचाकीचालकास मारहाण करून लुटले

कोल्हापूर : एकाच गाडीवरून कोल्हापुरात जाताना निर्जन रस्त्यावर दुचाकी थांबवून पाठीमागे बसलेल्याने दुचाकीचालकास काठीने बेदम मारहाण केली. त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटली. हा प्रकार कोल्हापूर ते गगनबावडा रोडवर दोनवडे फाटा ते बालिंगा पुलादरम्यानच्या रस्त्यावर घडला. मारहाणीत समशेरलाल काशीम पटेल (वय ४५, रा. खुपिरे, ता. करवीर) हे जखमी झाले. करवीर पोलिसांत नारायण गोपीलाल बलाई (रा. मुळगाव- रघुनाथपुरम, जि. भिलवाडा, रा. राजस्थान) या संशयितावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पटेल व बलाई यांच्यात देण्या-घेण्यावरून वाद होता. मलिक पटेल याने आपला भाऊ समशेरलाल पटेल याला फोन केला. त्याने समशेरलाल याला पैशासह नारायण बलाई याला आपल्या दुचाकीवरून घेऊन कोल्हापुरात गंगावेशमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार समशेरलाल याने नारायण यांना बोलावून घेतले, तसेच त्यांना आपल्या दुचाकीवर घेऊन ते गंगावेशमध्ये येत होते. लघुशंकेचे निमित्त करून नारायण याने दुचाकी निर्जन रस्त्यावर थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर लघुशंकेला गेलेले नारायण हे हातात काठी घेऊन परतले. त्यांनी फिर्यादी समशेरलाल याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले, तसेच त्यांच्याकडील ४५ हजारांची रोकड जबरदस्तीने लुटून पलायन केले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: The biker was beaten and robbed