शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

बिद्रीच्या सर्पमित्राने घोणससह 73 पिल्लांना दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 2:19 PM

सर्पमित्र सयाजी चौगले यांनी दाखविलेल्या या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे

रमेश वारकेबोरवडे  : साप असा शब्द उच्चारला तरी माणसाला घाम फुटतो. निसर्गाने निर्माण केलेला हा सुंदर जीव सृष्टीच्या जीवनचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे.घोणस आणि तिच्या ७३ पिल्लांना बिद्री ( ता. कागल ) येथील सर्पमित्र सयाजी चौगले यांनी जीवदान दिले. ही घोणस आणि तिची पिल्ली राहत्या घरात किंवा आजूबाजूच्या घरात शिरण्याआधीच पकडली गेली. सर्पमित्र सयाजी चौगले यांनी दाखविलेल्या या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.कुर येथील बाजीराव कुंडलिक मिसाळ यांना राहत्या घरी साप दिसल्याने त्यांनी सयाजी चौगले यांना फोनवरुन कल्पना दिली. सयाजी यांनी हा साप पकडला असता तो घोणस जातीचा मादी साप असल्याचे दिसून आले. त्यांनी या सापाला  पोत्यामध्ये बंद करून कात्यायनी  जंगलात सोडण्यास नेले असता ती प्रसुत होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  परंतू तोपर्यंत १० पिल्ली जंगलात गेली तर उष्माघाताने तीन पिल्लांचा मृत्यू झाला.त्यांनी या घोणस सापाला परत पोत्यात  घालून घरी आणले; तोपर्यंत तिने आणखी ६३ पिल्लांना जन्म दिला होता. या पिल्लांचा व्यवस्थितपणे जन्म झाल्यावर सयाजी चौगलेंनी घोणस व तिच्या ६३ पिल्लांना संध्याकाळी थंड वातावरणात कात्यायनी जंगल परिसरात सोडून दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे घोणस व पिल्लांचा जीव वाचल्याने त्यांना जणू पुनर्जन्मच मिळाला.

वास्तविक घोणस जातीच्या सापांचा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा प्रजननाचा काळ असतो. परंतु बदलत्या वातावरणामुळे क्वचित प्रसंगी अवेळीही प्रजनन होऊ शकते. पकडलेल्या मादी आणि पिल्लांना सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले आहे. - बाजीराव कुदळे व सयाजी चौगले (सर्पमित्र )

टॅग्स :kolhapurकोल्हापूर