कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:39+5:302021-06-16T04:33:39+5:30

जन्म : दि. ३ फेब्रुवारी १९३५ शालेय शिक्षण : १९४२ ते १९५२ महाविद्यालयीन आणि बी. ई. मेकॅॅनिकलचे शिक्षण ...

Bhishmacharya of Kolhapur's foundry industry lost | कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य हरपले

कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य हरपले

जन्म : दि. ३ फेब्रुवारी १९३५

शालेय शिक्षण : १९४२ ते १९५२

महाविद्यालयीन आणि बी. ई. मेकॅॅनिकलचे शिक्षण : १९५२ ते १९५८

विवाह : दि. २९ जून १९५५

किर्लोस्कर कंपनीतील नोकरी : १९५८ ते १९६६

भागीदारीमध्ये उद्योगाची सुरूवात : १९६६ ते १९८२

शिवाजी पार्कातील कस्तुरी बंगल्याची उभारणी : १९७६

स्व:मालकीच्या उद्योगाची सुरूवात : १९८२

श्रीराम फौंड्रीची स्थापना : १९८५

आष्टा लायनर्सची सुरूवात : १९८९

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्षपद : २००० ते २००७

रूद्रपूर (उत्तरांचल) येथे फौंड्रीची सुरूवात : २००८

चौकट

म्हादबा मेस्त्री, रामभाई सामाणी यांची शाबासकी

रामप्रताप झंवर यांनी ५० हजारांचे भांडवल गुंतवून भागीदारीतील व्यवसायाचा विस्तार केला. त्यावेळी त्यांना औद्योगिक क्षेत्रातील नामवंत उद्योजक म्हादबा मेस्त्री, रामभाई सामाणी, वाय. पी. पोवार यांनी शाबासकी दिली.

चौकट

‘परि यासम हा’मधून उलगडला जीवनप्रवास

ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांनी आपला जीवनप्रवास ‘परि यासम हा’ या चरित्रातून उलगडला. २२० पानांच्या या पुस्तकाचे मार्च २०१२मध्ये प्रकाशन झाले.

प्रतिक्रिया

जीवनात मोठा संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करून ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांनी उद्योगक्षेत्रात यशस्वी वाटचाल केली. कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगातील ते भीष्माचार्य होते. त्यांच्या निधनाने उद्योजकांचे मार्गदर्शक हरपले आहेत.

- सचिन मेनन, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन.

कष्टातून उद्योगाची उभारणी करून जगभरात कोल्हापूरचा नावलौकिक उद्योजक रामप्रताप झंवर यांनी केला. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सला ते नेहमी मार्गदर्शन करायचे. मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहोत.

- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.

Web Title: Bhishmacharya of Kolhapur's foundry industry lost