भास्कर पवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:01+5:302021-02-06T04:42:01+5:30

कोल्हापूर : पेठ नाका (जि. सांगली) येथील भास्कर लालासाहेब पवार (वय ८७, सध्या माळी कॉलनी, टाकाळा) यांचे गुरुवारी दुपारी ...

Bhaskar Pawar passes away | भास्कर पवार यांचे निधन

भास्कर पवार यांचे निधन

कोल्हापूर : पेठ नाका (जि. सांगली) येथील भास्कर लालासाहेब पवार (वय ८७, सध्या माळी कॉलनी, टाकाळा) यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे प्रमुख डॉ. सूरज पवार यांचे ते वडील होत. कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या उभारणीत व वाटचालीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.

एस.टी. महामंडळातून ते सरव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले होते. सेवेत असतानाही त्यांनी गोरगरीब कुुटुंबातील अनेक तरुणांना एसटीमध्ये नोकरी लावली. त्यांच्या अडीअडचणीलाही ते धावून जात असत. गरिबाबद्दल त्यांना कणव होती. कॅन्सर रुग्णांनाही ते मदत करीत असत. योगायोग म्हणजे जागतिक कॅन्सर दिनीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पुण्यातील प्रसिद्ध प्रसृतीतज्ज्ञ डॉ. वैशाली चव्हाण व हुबळीच्या प्रज्द्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. मंजूषा मैत्राणी या मुली, सून डॉ. रेश्मा पवार व नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०४०२२०२१ कोल भास्कर पवार (निधन)

Web Title: Bhaskar Pawar passes away