शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भानु अथय्या यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध : जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:50 IST

कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील राजोपाध्येंच्या वाड्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण एमएलजीमध्ये घेतल्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचे शिक्षण घेतले. यानंतर कधीही मागे वळून न पाहिलेल्या या लेकीने देशाला १९८२ साली पहिलं वहिलं ऑस्कर मिळवून दिले.

ठळक मुद्देभानु अथय्या यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध राजोपाध्येवाडा, भानुमती ते ऑस्कर, जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर : कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील राजोपाध्येंच्या वाड्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण एमएलजीमध्ये घेतल्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचे शिक्षण घेतले. यानंतर कधीही मागे वळून न पाहिलेल्या या लेकीने देशाला १९८२ साली पहिलं वहिलं ऑस्कर मिळवून दिले.

ज्येष्ठ वेशभूषाकार भानु अथय्या यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. येथे २००९ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होेते.भानु अथय्या यांचे मूळ नाव भानुमती. वडील आण्णासाहेब राजोपाध्ये हे छत्रपती घराण्याशी संबंधित होते. आई शांताबाई या गृहिणी. या दांपत्याच्या सात मुलांपैकी त्या तिसऱ्या. त्या नऊ वर्षाच्या असताना वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे शालेय शिक्षण एमएलजी हायस्कूलमध्ये झाले.

बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. याच क्षेत्रातील पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. एका मासिकासाठी काम करत असताना त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंध आला आणि वेशभूषाकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, आणि त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गांधी चित्रपटासाठी १९८२ साली ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा कोल्हापूर महापालिकेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता.त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रावर आधारित मालिकेसाठी त्यांनी महाराजांच्या भूमिकेत असलेले राहुल सोलापूरकर यांच्यासाठी वेशभूषा केली होती. पुढे त्यांनी ही जबाबदारी दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्यावर सोपवली.

कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २००९ साली घेण्यात आलेल्या पहिल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी त्या कोल्हापुरात आल्या. यावेळी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतरही दोन, तीन वेळा त्या कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन गेल्या होत्या. 

करवीरच्या कन्या असलेल्या आणि जागतिक पातळीवर ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या भानु अथय्या यांचे कला क्षेत्रातील योगदान नेहमीच सर्वांना प्रेरणा देत राहील. मुंबईतील चित्रपट क्षेत्रात आपल्या सर्जनशील कलेने दिलेले त्यांचे योगदान महिलांसाठी आदर्शवत आहे.- आमदार चंद्रकांतदादा पाटील

 

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर