शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉटचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी जागा मालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

कोल्हापूर : जागेचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी जागा मालकास फरफटत नेऊन त्यांना विटानी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार राजेंद्रनगर झोपडपट्टीत ...

कोल्हापूर : जागेचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी जागा मालकास फरफटत नेऊन त्यांना विटानी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार राजेंद्रनगर झोपडपट्टीत घडला. हल्ल्यात अरुण नारायण जगदने (वय ५९ रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, न्यू वसाहत) हे जखमी झाले. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार विश्वनाथ उर्फ बिल्या सौदागर कांबळे, शंकर नागटिळे, देवदास अविनाश सकट (सर्व रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) या तिघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्रनगर परिसरातील विश्वनाथ उर्फ बिल्या कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार आहे. त्याची राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरात प्रचंड दहशत आहे. रविवारी सकाळी कांबळे तसेच त्याचे साथीदार शंकर नागटिळे, देवदास सकट यांनी अरुण जगदने यांच्या मालकीच्या राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातील प्लॉटमध्ये लाकडी बांबू मारून अतिक्रमण केले. त्यानंतर सकाळी तिघांनीही अरुण जगदने यांचे घर गाठले. तेथे याची गळपट्टी पकडून त्याला फरफटत घरातून बाहेर ओढूले. तसेच रिकाम्या जागेचे एक लाख रुपये दे अन्यथा ती जागा मला दे, अशी धमकी त्यांनी जगदने यांना दिली. धमकीला न घाबरता जागा देणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याने संतप्त झालेल्या तिघांनी जगदने यांच्या डोक्यात वीट मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांची पत्नी सोडविण्यासाठी आली असता त्या तिघांनी पत्नी व मुलाच्या अंगावरही विटा फेकून मारल्याने पत्नी किरकोळ जखमी झाली. याप्रकरानंतर आरडाओरडा होऊन गोंधळ उडाल्याने परिसरातील लोक जमा झाले, त्यानंतर तिघेही हल्लेखोर तेथून पळून गेले. याप्रकरणी अरुण जगदने यांनी राजारामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.