शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘करवीर’मध्ये अस्तित्वाची लढाई

By admin | Updated: October 10, 2014 23:00 IST

‘पी. एन.- नरके’ यांची प्रतिष्ठा पणाला : ग्रामपंचायतीसारखी प्रचार यंत्रणा

राजाराम लोंढे - कोल्हापूर =-करवीरमध्ये पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके यांच्या अस्तित्वाची लढाई पाहावयास मिळत आहे. शेवटच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीसारखी यंत्रणा कार्यरत झाल्याने येथे टोकाचा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा देऊन सवयीप्रमाणे भूमिका बदलली असली तरी राजू सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या तडजोडी यशस्वी झाल्या, तर नरके व पाटील या मातब्बरांसमोरील अडचणी वाढू शकतात. नरके, पाटील व सूर्यवंशी यांच्यासह ‘भाजप’चे के. एस. चौगुले, ‘मनसे’चे अमित पाटील हेही नशीब अजमावत आहेत. निवडणूक अंतिम टप्प्यापर्यंत पाटील, नरके व सूर्यवंशी यांची प्रचारातील ईर्ष्या कायम आहे. पाटील यांनी नरके यांच्या पाच वर्षांतील कार्यपुस्तिकेलाच टीकेचे लक्ष केले आहे. जिल्हा परिषद, डोंगरी विकास निधीतून झालेली कामे आपल्या कार्यपुस्तिकेत छापून नरके यांनी दिशाभूल सुरू केल्याची टीका ते करीत आहेत. जे पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे निवडणुका आल्या की मतदारसंघात उगवतात, त्यांना विकास काय दिसणार? अशी बोचरी टीका नरके करीत आहेत. आजी-माजी आमदार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, करवीरच्या विकासासाठी साथ देण्याचे आवाहन सूर्यवंशी करीत आहेत. जुन्या करवीरमधील कोपार्डे, शिये व वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघांत नरके यांचा वरचष्मा दिसत असला तरी गेल्यावेळचे मताधिक्य राखताना त्यांची दमछाक होणार आहे. कळे, यवलूज मतदारसंघांत पाटील यांचे चांगले पॅचवर्क झाले आहे. त्यात के. एस. चौगुले व सूर्यवंशी कोणाची मते खेचतात, यावरच येथील मताधिक्य अवलंबून आहे. कळे व बाजारभोगाव परिसरात नरके यांची हवा कायम आहे. गगनबावडा तालुक्यात राष्ट्रवादीचे पी. जी. शिंदे यांनी नरके यांना पाठिंबा दिल्याने येथे मताधिक्यासाठी नरके व पाटील यांना कसरत करावी लागणार आहे. सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाने गेल्या वेळेला नरके यांना मताधिक्य दिले होते. आता तशी परिस्थिती नसली तरी सूर्यवंशी यांचे कार्यक्षेत्र याच मतदारसंघात येत असल्याने पाटील, नरके व सूर्यवंशी यांच्या गटांचे अस्तित्व पणाला लागले आहे. सडोली खालसा व परिते जिल्हा परिषद मतदारसंघ पाटील यांचे होम पीच असले तरी येथील राष्ट्रवादीची ताकद नरके यांच्या पाठीशी आहे. गेल्या वेळेला या परिसराने पाटील यांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य दिले होते. एकंदरीत जुन्या करवीरमध्ये पाटील यांनी केलेले पॅचवर्क, पन्हाळा-गगनबावड्यातील नरके यांची हवा व जुन्या सांगरूळमध्ये सूर्यवंशी यांनी ठेवलेला संपर्क पाहता शेवटपर्यंत विजयाचा लंबक झुलत राहणार, हे निश्चित.करवीरएकूण मतदार २,८७,४८0प्रचारातील मुद्दे -चंद्रदीप नरके यांच्या कार्यपुस्तिकेवर विरोधकांची टीकेची झोडपी. एन. पाटील यांच्या मतदारसंघातील संपर्कावरून विरोधक आक्रमकनरके यांच्या पक्षनिष्ठेवर कॉँग्रेसचा हल्लाबोलसर्वच उमेदवारांची एकमेकांवर व्यक्तिगत पातळीवर टीकाटिपणी आमदार चंद्रदीप नरके आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यातील निधीचा श्रेयवाद आणि पोष्टरबाजी