सोने-चांदी खरेदी न होण्यासाठी जमावबंदी लावा, कोल्हापुरात उद्धवसेनेचे उपरोधात्मक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:57 IST2026-05-18T15:56:44+5:302026-05-18T15:57:40+5:30

कोल्हापूर : ‘सोने नको, लोखंड खरेदी करा’, ‘सोने-चांदी खरेदी न होण्यासाठी आता जमावबंदी लावा’, अशा उपरोधात्मक घोषणा देत उद्धवसेनेच्या ...

Ban on gatherings to prevent purchase of gold and silver, Uddhav Sena's ironic protest in Kolhapur | सोने-चांदी खरेदी न होण्यासाठी जमावबंदी लावा, कोल्हापुरात उद्धवसेनेचे उपरोधात्मक आंदोलन

सोने-चांदी खरेदी न होण्यासाठी जमावबंदी लावा, कोल्हापुरात उद्धवसेनेचे उपरोधात्मक आंदोलन

कोल्हापूर : ‘सोने नको, लोखंड खरेदी करा’, ‘सोने-चांदी खरेदी न होण्यासाठी आता जमावबंदी लावा’, अशा उपरोधात्मक घोषणा देत उद्धवसेनेच्या वतीने रविवारी ऐतिहासिक बिंदू चौकात आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात उद्धवसेनेचे पदाधिकारी बैलगाडीतून बिंदू चौकात आले. तिथे त्यांनी इंधन दरवाढीसह महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उद्धवसेनेचे शहरप्रमुख मंजीत माने म्हणाले, महागाईने सामान्य माणूस होरपळत असताना केंद्र सरकार रोज नवीन नियमावली आणत आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे? असा प्रश्न उभा राहिला आहे.

सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, देशावर पहिल्यांदाच अशा प्रकारचे आर्थिक अरिष्ट आले आहे. केंद्र सरकारने कोणत्याही उपाययोजना न केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रुपयाचे अवमूल्यन झाले. त्याचे गंभीर परिणाम देशातील नागरिकांना सोसावे लागत आहेत. यावेळी विराज पाटील, विनोद खाेत, राजू यादव, राजू जाधव, दिनेश परमार, हर्षल पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title : कोल्हापुर में शिवसेना (यूबीटी) का महंगाई के खिलाफ प्रदर्शन, सोने की खरीद का उपहास

Web Summary : शिवसेना (यूबीटी) ने कोल्हापुर में बढ़ती महंगाई के खिलाफ विरोध प्रदर्शन किया, सोने की खरीद पर प्रतिबंध लगाने की मांग की। प्रदर्शनकारियों ने ईंधन की कीमतों में वृद्धि और आर्थिक कठिनाई को उजागर करने के लिए बैलगाड़ियों का इस्तेमाल किया, केंद्र सरकार की नीतियों और रुपये के अवमूल्यन की आलोचना की। उन्होंने वित्तीय संकट के बीच सरकार पर निष्क्रियता का आरोप लगाया।

Web Title : Shiv Sena (UBT) Protests in Kolhapur Against Inflation, Mocking Gold Purchases

Web Summary : Shiv Sena (UBT) protested in Kolhapur against rising inflation, sarcastically demanding restrictions on gold buying. Demonstrators used bullock carts to highlight fuel price hikes and economic hardship, criticizing the central government's policies and rupee devaluation. They accused the government of inaction amidst financial crisis.