शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बालमनांनी अनुभवली ‘सफर विमानां’ची

By admin | Updated: January 19, 2015 00:34 IST

‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे आयोजन : पहिल्या दिवशी अलोट गर्दी ; मंगळवारपर्यंत खुले राहणार प्रदर्शन

कोल्हापूर : ‘बाबा विमान कसे आकाशात उडते हो...’, ‘विमानाला पंख का असतात?’, ‘दादा, ‘थ्री इडियट्स’मधील कॉडकॉप्टर असेच होते काय?’ असे बालमनात घोंघावणारे प्रश्न आज, रविवारी ‘लोकमत’ बाल विकास मंचने आयोजित केलेल्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनात चुटकीसरशी सुटल्याचे चित्र होते. विमानाबाबत माहिती घेण्यासाठी पालकांसमवेत बालचमूंनी अलोट गर्दी प्रदर्शनास झाली होती. कमला कॉलेजच्या डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे व शाहू दूध मार्केटिंग व्यवस्थापक सुनील मगदूम यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन झाले. याप्रसंगी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आय.सी.सी.आय. बँकेचे प्रवीण सावंत, ‘पीबीसी’स अ‍ॅरो हबचे बाळासाहेब चित्ते व प्रणव चित्ते, ‘लोकमत’चे इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विमानाने घिरटी घातल्याचा आवाज आल्यानंतर लहान मुले घराबाहेर, गच्चीवर मोकळ्या जागेत येऊन विमान पाहण्यासाठी आकाशाकडे नजरा लावतात. आकाशाकडे भिरभिरणारी नजर विमानाची छबी पाहण्यासाठी आतुर होते. शहरासह ग्रामीण भागात सर्रास दिसणारे हे दृश्य असते. बालमनाला विमानाबाबत पडणारे असंख्य प्रश्न घेऊनच आजच्या प्रदर्शनात बालचमू सहभागी झाला. विमानाची बारीकशी छबी मनात घेऊन आलेल्या बालकांनी जेव्हा आजच्या प्रदर्शनात हुबेहूब विमानांची प्रतिकृती पाहिली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. स्वप्नातील विमानांच्या हुबेहूब असणाऱ्या प्रतिकृती पाहून झालेला आनंद बालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.
विमानाचा शोध कसा लागला, विमान कसे उडते यापासून ते विमान कसे तयार होते याची सविस्तर माहिती बाल विकास मंचने आयोजित ‘सफ र विमानांची’ या प्रदर्शनात दिली जात आहे. तसेच वैमानिक बनण्यासाठी काय करावे, त्या क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबाबतही प्रदर्शनात सखोल माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात भेटी दिलेल्या हजारो कुटुंबीयांनी विमानाबाबतच्या ज्ञानात भर घातली. या ठिकाणी विविध ८० विमानांच्या प्रतिकृती व त्यांची रचना असलेले सुटे भाग मांडण्यात आले आहेत. विमानाच्या प्रत्येक घटकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती ‘पीबीसी’स अ‍ॅरो हबचे डायरेक्टर प्रणव चित्ते देतात. दोन दिवस सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते ‘पीबीसी’स अ‍ॅरो हब हे आहेत.

‘सफ र विमानाची’ हे प्रदर्शनातून शोच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांमध्ये विमान अभियांत्रिकी तसेच अवकाशयान तंत्रज्ञानाबाबतीत आवड निर्माण व्हावी हा उद्देश आहे. करिअरच्या दृष्टीने योग्य वाव या प्रदर्शनातून अनेकांना मिळणार आहे.
- भारत खराटे, चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे संचालक
प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना विमानांबाबत सविस्तर माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते. ‘लोकमत’ची ही वेगळी संकल्पना असल्याने आम्ही त्यांना सहकार्य केले आहे आणि यापुढेही त्यांच्या वेगळ्या संकल्पनेला आमचे नेहमीच सहकार्य राहील. वैमानिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा.
- सुनील मगदूम, शाहू दूध मार्केटिंगचे व्यवस्थापक

मंगळवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार
मंगळवार (दि. २०) पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले राहणार आहे. तसेच दर दोन तासांनी ‘क्वॉड कॉप्टर’चे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.