कर्करोग दिनानिमित्त प्रबोधन रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST2021-02-12T04:23:42+5:302021-02-12T04:23:42+5:30

सडोली (खालसा) : रा. बा. पाटील विद्यालय सडोली (खा.) सलाम मुंबई फौंडेशन, शिक्षण विभाग जि. प. कोल्हापूर व ग्रामपंचायत ...

Awareness rally on the occasion of Cancer Day | कर्करोग दिनानिमित्त प्रबोधन रॅली

कर्करोग दिनानिमित्त प्रबोधन रॅली

सडोली (खालसा) : रा. बा. पाटील विद्यालय सडोली (खा.) सलाम मुंबई फौंडेशन, शिक्षण विभाग जि. प. कोल्हापूर व ग्रामपंचायत सडोलीच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग दिनाचे औचित्य साधून युवतींची मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन पोलीस पाटील पंकज कुमार पाटील व ग्रामसेवक पी. एम. भोपळे यांच्या हस्ते करण्यात आले. गल्लोगल्लीत रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत झाले.

युवतींनी नऊवारी साडी व फेटा परिधान केला होता. फलकावर असलेल्या मार्मिक व प्रबोधन चित्रामुळे लोकजागृती झाली. एकनाथ कुंभार यांनी उपस्थित लोकांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन या व्यसनाची दाहकता विषद करण्यात आली. यावेळी आरती पाटील, तेजस्विनी पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीसाठी मुख्याध्यापक नर्लेकर, रावसो शिंदे, भगतसिंग पाटील, तानाजी पाटील, निवास पाटील, शिवाजी चव्हाण, धनाजी कुंभार, सागर चव्हाण, कृष्णात काशीद, मारुती साळोखे यांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Awareness rally on the occasion of Cancer Day