शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

राधानगरी तालुका : ३२७ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत

भोगावती : राधानगरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीनी आपल्याच कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार, भविष्य निर्वाह निधीचे लाखो रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टगेगिरी करणाऱ्या करवीर तालुक्यातील दोन पन्हाळा ग्रापंचायतीच्या कारभाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. टगेगिरी करणाऱ्यांनी यातून काही धडा घेतला नाही, तर फौजदारी गुन्ह्यास सामोरे जावे लागणार हे निश्चित.राधानगरी तालुक्यात ३२७ ग्रा. पं. कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रा.पं.च्या कारभाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांच्या कामातून खऱ्या अर्थाने गावगाडा चालताना दिसून येतो, गावची स्वच्छता, घरफाळा वसुली, पाणी पुरवठा, दिवाबत्तीची सोय यांसह अनेक बाबी कर्मचाऱ्यांच्यावर कामावर अवलंबून राहतात. पंचायतीचा प्रगतीचा आलेख यावर ठरत असतो. गावकऱ्यांना चांगली सेवा देण्यात कर्मचाऱ्यांचा खरा वाटा राहिला असताना कारभारी मात्र त्यांच्याच डोक्यावरील लोणी खात आहेत. कर्मचाऱ्याचे हक्काचे पैसे अन्य बाबी म्हणून खर्च दाखवला जात आहे. मग घरफाळा, पाणीपट्टी, शासकीय मदत विविध योजनांच्या रूपाने आलेला पैसा कोठे गेला याचे ग्रा. पं.कडे उत्तर नाही.तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची खाती उघडण्यात आली आहे. मात्र, खात्यावर पैसाच भरलेला नाही. यासह वाढीव पगाराचे मिळून ७० लाखांच्या आसपास असणाऱ्या रकमेवर कर्मचाऱ्यांना पाणी सोडावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या आदेशाच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीला लेखी कळवून देखील कारभाऱ्यांनी दाद दिलेली नाही.अनेक ग्रा. पं.नी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. शिवाय अनेक ग्रा. पं.नी वाढीव पगाराचे पैसे दिलेले नाहीत. यावरून राधानगरी तालुका ग्रा. पं. कर्मचारी संघ लढा उभा करत आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांवरील राजकीय हितसंबंधामुळे आंदोलनात अडथळा निर्माण होत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे. ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन आणि भविष्य निर्वाह निधीबाबत धांदल करणाऱ्या करवीर तालुक्यातील माळ्याची शिरोली, केकतवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील तांदूळवाडी या ग्रा. पं. पुढे झाल्या आहेत. राधानगरी तालुक्यातील काही ग्रा. पं.मध्ये कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष सुभाष लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.