शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झालेल्या चुका टाळून महापालिकेसाठी तयार राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:06 IST

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे गेले २0/२२ दिवस पाटील मुंबईतच होते. त्यांना भेटण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती; त्यामुळे त्यांनी बुधवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील, कोल्हापुरात गाठीभेटींचे सत्र

कोल्हापूर : गेल्या महापालिकेपासून आताच्या विधानसभेपर्यंत काही चुका झाल्या आहेत. तेव्हा त्या चुका टाळून खचून न जाता आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार राहा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे गेले २0/२२ दिवस पाटील मुंबईतच होते. त्यांना भेटण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती; त्यामुळे त्यांनी बुधवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या.

पाटील म्हणाले, की गेल्या महापालिकेवेळी चुका झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. आता असे होणार नाही. पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी मिळेल. त्या दृष्टीने आता सर्वांनीच तयारीला लागावे. सध्या पक्षाच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचाही आढावा यावेळी पाटील यांनी घेतला.

यावेळी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, गणेश देसाई, अ‍ॅड. संपतराव पवार, आर. डी. पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस पाटील यांनी कोणताही जाहीर कार्यक्रम न घेता अनेकांच्या घरी सांत्वनपर आणि सदिच्छापर भेटी दिल्या.सरकार आमचेचयावेळी राज्यात सत्ता कुणाची येणार याबाबत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याकडे विचारणा केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आणि कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाkolhapurकोल्हापूर