शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेमध्ये कोरेंना महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 13:02 IST

Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांना महाविकास आघाडीसोबत घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास जनसुराज्यच्या सहा सदस्यांचे पाठबळही आघाडीला मिळणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेमध्ये कोरेंना महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रयत्नजनसुराज्यच्या सहा सदस्यांचे पाठबळही आघाडीला मिळणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांना महाविकास आघाडीसोबत घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास जनसुराज्यच्या सहा सदस्यांचे पाठबळही आघाडीला मिळणार आहे.राज्याच्या राजकारणात डॉ. कोरे भाजपसोबत आहेत. पण काही महिन्यांपूर्वी गोकूळच्या निवडणुकीत डॉ. कोरे कॉंग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिले.

यापुढील काळात म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीत डॉ. कोरे यांना सोबत घेतल्याचा फायदा महाविकास आघाडीस होणार आहे. यामुळे डॉ. कोरे यांच्याशी राजकीय दोस्ती कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.चौकटआमदार पी. एन. पाटीलयांची भूमिकाही महत्त्वाचीगोकूळच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी पालकमंत्री पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यापासून दूर गेले. त्यानंतर झालेल्या कॉंग्रेसच्या एका जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी आता गोकूळचे संपले, पी. एन. आणि मी एकाच पक्षात आहोत. यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लावणार असे, स्पष्ट केले. यानंतर पहिल्यादांच जि. प. मधील पदाधिकारी बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हेही इच्छुक आहेत. पण अध्यक्षपदासाठी यावेळी त्यांचे नाव कॉंग्रेसकडून मागे पडले आहे. या रागातून आमदार पी. एन. पाटील पदाधिकारी बदलात काय भूमिका घेणार यासंबंधी उत्सुकता आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदVinay Koreविनय कोरेkolhapurकोल्हापूर